सध्या सोशल मीडियावर #BottleCapChallange चा धुमाकूळ सुरु आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्यांपासून क्रिकेटपटूंपर्यंत महत्वाच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर आपले #BottleCapChallange चे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आपलं #BottleCapChallange पूर्ण केलं आहे. विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर १५ सेकंदाराच व्हिडीओ पोस्ट केला आहे.
१५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये विराटने रिव्हर्स स्विपचा फटका खेळत पाण्याच्या बाटलीवरचं झाकण उडवलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओला प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा समालोचन करतानाचा आवाजही दिलेला आहे. विराटच्याआधी माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, शिखर धवन यांनीही हे #BottleCapChallange पूर्ण केलेलं आहे.