दिमाखदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर दिल्लीने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर ५ विकेट्सनी विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दव आणि गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी यांच्या जोरावर दिल्लीने महाराष्ट्राला १९४ धावांतच रोखले. केदार जाधवने ४८ तर स्वप्निल गुगळेने ४४ धावा केल्या. दिल्लीतर्फे मनन शर्मा आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ध्रुव शोरे आणि मिलिंद यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य गाठले. ध्रुवने ५ चौकारांसह ५७ तर मिलिंदने ५ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ५० षटकांत ९ बाद १९४ (केदार जाधव ४८, स्वप्निल गुगळे ४४, मनन शर्मा ३/२१, पवन नेगी ३/३८) पराभूत विरुद्ध दिल्ली : ४८.४ षटकांत ५ बाद १९७ मिलिंद नाबाद ५८, ध्रुव शोरे ५७, स्वप्निल गुगळे २/३९) .