Vijay Hazare Trophy 2024-25 semi-finals four teams confirmed : विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठणाऱ्या चार संघांची नावं निश्चित झाली आहेत. ज्यामध्ये हरियाणा, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्र या संघाचा समावेश आहे. विदर्भ संघाने राजस्थानचा ९ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. तर हरियाणा संघाने गुजरात संघाचा २ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना १५ जानेवारीला हरियाणा आणि कर्नाटक यांच्यात होणार आहे. दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात होईल. उपांत्य फेरीचे हे दोन्ही सामने बडोद्याच्या मैदानावर होणार आहेत. चारपैकी जे संघ उपांत्य फेरीत विजय मिळवतील, ते संघ अंतिम फेरीत धडक मारतील. यानंतर विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना १८ जानेवारीला बडोद्याच्या मैदानावर होणार आहे. हे सर्वा सामने दुपारी १:३० पासून सुरु होणार आहेत.

महाराष्ट्र पंजाबवर मात करत उपांत्य फेरीत दाखल –

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्राने पंजाबचा ७० धावांनी पराभव करत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. या सामन्यात युवा अर्शीन कुलकर्णीने महाराष्ट्रासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आणि १०७ धावांचे योगदाने दिले. तसेच यष्टीरक्षक फलंदाज नितीन नाईकने २९ चेंडूत आक्रमक नाबाद अर्धशतक झळकावले आणि महाराष्ट्राने पंजाबवर शानदार विजय नोंदवला. अंकित बावणेनेही महाराष्ट्राच्या विजयात मोलाचे योगदान देत ६० धावा केल्या. अर्शीन आणि बावणे यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ ४४.४ षटकांच २०५ धावांवर गारद झाला.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ स्टार खेळाडू करणार नेतृत्त्व

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांचे कर्णधार:

१. हरियाणा – अंकित कुमार
२. विदर्भ – करुण नायर
३. महाराष्ट्र – ऋतुराज गायकवाड<br>४. कर्नाटक – मयंक अग्रवाल

हेही वाचा – Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक

विजय हजारे करंडक उपांत्य फेरीचे वेळापत्रक:

हरियाणा विरुद्ध कर्नाटक – १५ जानेवारी
विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र – १६ जानेवारी
अंतिम सामना – १८ जानेवारी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay hazare trophy maharashtra haryana karnataka and vidarbha qualify for the semi finals 2024 25 vbm