लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता गगन नारंग दिल्लीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होत आहेत. यांच्यासह बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, अ‍ॅथेन्स ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता राज्यवर्धन सिंग राठोड, रंजन सोधी आणि जॉयदीप कर्माकर हे अव्वल नेमबाजही सहभागी होणार आहेत.
महिला गटात अंजली भागवत, सुमा शिरूर या वरिष्ठ नेमबाजांसह हिना सिधू, मम्पी दास या नेमबाज सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय नेमबाजी संघटनेशी संलग्न ४१ संघटनांकडून मिळून २३०० नेमबाज आपले कौशल्य आजमवणार आहेत, अशी माहिती भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली.

Story img Loader