लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या विजय कुमारने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी दोन पदकांची कमाई केली. या पदकांमुळे भारताच्या खात्यात एकूण ४४ पदके (१७ सुवर्ण, १४ रौप्य व १३ कांस्य) जमा झाली. २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात विजयला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, तर सांघिकगटात समरेश जंग आणि पेंबा तमंग यांच्यासह विजयने रौप्यपदकाची कमाई केली. २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल गटात विजयला थायलंडच्या पोंगपोल कुचेरातन्नाकडून पराभव पत्करावा लागला. कोरियाच्या डाई क्यू जंगने ५८५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. मात्र, सांघिक गटात विजयने पेंबा व समरेशसह १७३६ गुणांची कमाई करित रौप्यपदक पटकावले .