भारतातील बँकांचे कोटय़वधी रुपये बुडवून लंडनमध्ये पसार झालेल्या विजय मल्याने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातूनही काढता पाय घेतला आहे. मल्याचे राजीनामापत्र बंगळुरू संघाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठवले असून संघाच्या संचालकपदी रसेल अ‍ॅडम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बंगळुरूच्या संघाचे मालकत्व आता रसेल अ‍ॅडम्स यांच्याकडे असेल. याबाबतचे पत्र बंगळुरू संघाने बीसीसीआयमधील आयपीएलच्या गव्हर्निग कौन्सिलच्या अधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रामध्ये मल्याने संघाच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचेही सांगण्यात आले आहे.

Story img Loader