मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत इंग्लंडने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात आणले. जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ या अनपेक्षित पराभवामुळे निराश मन:स्थितीत आहे. यात भर म्हणून भारताचा कर्णधार विजय झोलवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी एका सामन्याची बंदी ठोठावण्यात आली आहे तर फिरकीपटू आमिर गणीला ताकीद देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २.२.८ कलमाचा भंग केल्याप्रकरणी झोल दोषी आढळला आहे. ३०व्या षटकात कुलदीपने यादवच्या गोलंदाजीवर विजय झोलने इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटचा झेल टिपला. संयमी यावेळी आनंद साजरा करताना झोलने बकेटला उद्देशून आक्षेपार्ह उद्गार काढले. दुसऱ्या प्रसंगात इंग्लंडच्या इड बरनार्डला बाद केल्यानंतर गणीने आक्षेपार्ह हावभाव आणि शब्द उच्चारले होते.

Story img Loader