महाराष्ट्राचा फलंदाज विजय झोल बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या (१९ वर्षांखालील) सराव शिबिरात सामील झाला आहे. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात तो खेळू शकणार नाही.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) मंगळवारपासून भारतीय युवा संघाच्या अंतिम सराव शिबिराला प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे म्हणाले, ‘‘१९ वर्षीय डावखुरा फलंदाज विजय झोलसाठी हा पहिलाच प्रथम श्रेणी क्रिकेटचा हंगाम आहे. परंतु दुर्दैवाने रणजी स्पध्रेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी त्याला गमवावी लागत आहे. नेटमधील सरावापेक्ष रणजी अंतिम सामन्यातील सहभाग झोलसाठी अधिक फायदेशीर ठरला असता. परंतु आमच्या हातात काहीच नाही.’’
उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी झोलला खेळता यावे म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) परवानगी मागितली होती. परंतु महाराष्ट्राने बंगालचा तीन दिवसांत पराभव केल्यानंतर झोल याला बंगळुरू गाठावे लागले.
विजय झोल रणजी अंतिम सामन्याला मुकणार
महाराष्ट्राचा फलंदाज विजय झोल बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या (१९ वर्षांखालील) सराव शिबिरात सामील झाला आहे.
First published on: 23-01-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay zol told to skip ranji final