महाराष्ट्राचा फलंदाज विजय झोल बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या (१९ वर्षांखालील) सराव शिबिरात सामील झाला आहे. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात तो खेळू शकणार नाही.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) मंगळवारपासून भारतीय युवा संघाच्या अंतिम सराव शिबिराला प्रारंभ झाला. महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे म्हणाले, ‘‘१९ वर्षीय डावखुरा फलंदाज विजय झोलसाठी हा पहिलाच प्रथम श्रेणी क्रिकेटचा हंगाम आहे. परंतु दुर्दैवाने रणजी स्पध्रेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी त्याला गमवावी लागत आहे. नेटमधील सरावापेक्ष रणजी अंतिम सामन्यातील सहभाग झोलसाठी अधिक फायदेशीर ठरला असता. परंतु आमच्या हातात काहीच नाही.’’
उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी झोलला खेळता यावे म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) परवानगी मागितली होती. परंतु महाराष्ट्राने बंगालचा तीन दिवसांत पराभव केल्यानंतर झोल याला बंगळुरू गाठावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा