कर्णधार विजय झोल याने केलेले नाबाद शतक, तसेच शुभम खजुरिया, अखिल हेरवाडकर व संजू सॅमसन यांच्या शैलीदार अर्धशतकांमुळेच भारताच्या युवा संघाने श्रीलंकेच्या युवा संघाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत २ बाद ३३३ अशी शानदार सुरुवात केली. विजय झोलने नाबाद १२९ धावा करताना सॅमसन (नाबाद ७४) याच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी १६९ धावांची अखंडित भागीदारी रचली. त्याआधी खजुरिया (५२) व हेरवाडकर (७१) यांनी सलामीसाठी ७९ धावांची दमदार भागीदारी केली.
विजय झोलचे नाबाद शतक
कर्णधार विजय झोल याने केलेले नाबाद शतक, तसेच शुभम खजुरिया, अखिल हेरवाडकर व संजू सॅमसन यांच्या शैलीदार अर्धशतकांमुळेच भारताच्या युवा संघाने श्रीलंकेच्या युवा संघाविरुद्धच्या
First published on: 24-07-2013 at 05:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay zols ton takes india u 19 to 3332 on day 1 vs sri lanka colts