भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंगने आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. विजेंदरने सापाचे रक्त पिणारा हंगेरीचा मुष्टियोद्धा अलेक्झांडर होर्वार्थला तीन फे-यांमध्ये नॉकआउट केले. आपण सापाचे विष पिऊन रिंगणात उतरत असल्याचे होवार्थने यापूर्वी म्हटले होते.
विजेंदरसिंगचा हा सलग चौथा विजय आहे. विजेंदर आणि होर्वार्थमध्ये तीन राऊंडपर्यंत बुक्का-बुक्कीची खेळ चालला. मला काय झाले हे मला माहित नाही, पण यंदाच्या वर्षी माझ्यासाठी चांगली सुरूवात झाल्याचे विजेंदरने म्हटले आहे. नॉक आऊट मॅच जिंकल्यामुळे मी आणखीनच खुष आहे, अशी प्रतिक्रिया विजेंदरने दिली. तसेच माझा हा विजय मी शहिदांना अर्पण करत असल्याचेही विजेंदरने म्हटले.
माझ्या नसांत सापाचे रक्त असून, विजेंदर मला हरवू शकणार नाही. मी डाएटमध्ये सापाच्या रक्ताचा समावेश केला तेव्हापासून मी जास्त सराव करत आहे. तसेच माझे पंचही चांगले लागत आहेत, असे होर्वार्थ म्हणाला होता.
सापाचे रक्त पिणाऱ्या होर्वार्थला विजेंदरने हरवले; शहिदांना केला विजय समर्पित
हा विजय मी शहिदांना अर्पण करत असल्याचेही विजेंदरने म्हटले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 13-03-2016 at 13:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijender singh registers fourth consecutive win on the pro circuit