ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग (७५ किलो) व माजी युवा विश्वविजेता थॉकचॉम ननाओ सिंग (४९ किलो) यांनी विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
पटियाळात झालेल्या निवड चाचणीत ननाओने राष्ट्रकुल विजेत्या अमनदीप सिंगवर मात केली. ५२ किलो गटात राष्ट्रीय विजेता मदनलाल याने अनुभवी खेळाडू सुरंजॉय सिंग याचा पराभव केला. आशियाई विजेता शिवा थापाने अपेक्षेप्रमाणे ५६ किलो गटात विजय मिळविला. ६० किलो गटात विकास मलिक याची निवड झाली तर ६४ किलो गटात राष्ट्रकुल विजेता मनोजकुमार याला संधी मिळाली आहे. आशियाई रौप्यपदक विजेता मनदीप जांगरा यानेही संघात स्थान मिळविले. ८१ किलो गटात ऑलिम्पिकपटू सुमीत संगवान हा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या ध्वजाखाली उतरणार आहे.

Story img Loader