अमली पदार्थ सेवन केल्याबद्दल व त्याच्या व्यापारात हात असल्याचा संशय ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग याच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमधून सहीसलामत सुटका झाल्यानंतर विजेंदर हा पुन्हा बॉक्सिंग सरावाकडे वळला आहे. मात्र या अनुभवामुळे त्याचे हात चांगलेच पोळले गेले आहेत.
विजेंदर याने हेराईनचे सेवन केल्याचा तसेच अमली पदार्थाच्या व्यापाराशी त्याचा संबंध असल्याचा आरोप पंजाब पोलिसांनी केला होता. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीने त्याची उत्तेजक चाचणीही घेतली होती मात्र त्यामध्ये तो निर्दोष असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. ही चाचणी झाल्यानंतरही पंजाब पोलिसांनी विजेंदरच्या केसांची व नखांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी याचिका न्यायालयात केली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली.
या सर्व प्रकारात विजेंदर हा सरावापासून बराच काळ दूर होता. आता त्याने सरावास सुरुवात केली आहे. तो म्हणाला, ऑक्टोबरमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्याकरिता मी प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. हरियाना राज्य शासन, भारतीय ऑलिम्पिक महासंघ व भारतीय बॉक्सिंग महासंघ यांचा मी शतश: ऋणी आहे. माझ्या अडचणीच्या काळात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व मी निर्दोष असल्याचे त्यांनीही दाखवून दिल्यामुळे माझ्यावरील मानसिक ओझे दूर झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा