Vinesh Phogat Bajrang Punia resigns from Indian Railway Job : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. ती ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर होती. आता बजरंग पुनिया यांनीही राजीनामा दिला आहे. बजरंग आणि विनेश अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या दोघांनाही हरियाणा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाऊ शकते. विनेश आणि बजरंग यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. याबाबत साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.

विनेशने एक्सवर पोस्ट करत दिली राजीनाम्याची माहिती –

विनेश फोगटने भारतीय रेल्वेला पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. एक्सवर पत्र शेअर करताना विनेशने लिहिले की, “भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशाच्या सेवेत रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.”

thane tyre killer
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात टायर किलर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Former corporator Swapnil bandekar and four arrested
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी
pune female officer is main accused in MPSC exam question papers leak case
एमपीएससी घोटाळा ; आरोपींमागे मुख्य सूत्रधार महिला अधिकारी ?
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
trainee sub inspector took Rs 20000 monthly bribe to ignore action on illegal hookah parlour
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘हप्तेखोरी’ उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Prakash Ambedkar slams Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar: “मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपाला…”, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप; म्हणाले…

बजरंग पुनियाने पण दिला राजीमनामा –

बजरंग पुनिया भारतीय रेल्वेमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी पदावर कार्यरत होता. मात्र आता त्यानी पण राजीनामा दिला आहे. हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष बजरंगला तिकीट देऊ शकतो. हरियाणात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका आहेत. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पण त्याआधी १ आणि ४ तारखेला होणार होते. मात्र, आता तारीख बदलली आहे. बजरंग आणि विनेशच्या मुद्द्यावर कुस्तीपटू साक्षी मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात, कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात

आमच्या आंदोलनाला चुकीचे स्वरूप देऊ नये – कुस्तीपटू साक्षी मलिक

कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली, “बजरंग आणि विनेश हे दोघेही काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे ते राजीनामा देत आहेत. हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. आमच्या आंदोलनाला चुकीचे स्वरूप देऊ नये. महिलांसाठीची माझी चळवळ अजूनही कायम आहे. मी नेहमीच कुस्तीच्या हिताचा विचार केला आहे.”

हेही वाचा – PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका

गेल्या काही दिवसापासून अशी अटकळ बांधली जात आहे की विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. विनेश फोगट त्यांना भेटण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी गेली होती. अशा परिस्थितीत विनेश आणि बजरंग हरियाणातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

Story img Loader