Vinesh Phogat and Coach Responsible For Indian Wrestler Weigh in-PT Usha: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित ठरण्यात आले होते. याप्रकरणावर विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये याचिका सादर केली होती. सध्या CAS मध्ये यावर सुनावणी सुरू असून त्यावर १३ ऑगस्ट रोजी निकाल दिला जाणार आहे. या संपूर्ण वादावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी आता वजन नियंत्रित करणे ही खेळाडूची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. यासाठी वैद्यकीय पथकावर टीका करणे योग्य नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

५० किलो वजनी गट फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने विनेशला रौप्य पदकाची खात्री होतीच, परंतु पदक सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली होती. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर आयओएच्या वैद्यकीय पथकाला, विशेषत: डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहे.

पीटी उषा म्हणाल्या, ‘कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूंच्या वजन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकावर असते. आयओएचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमवर नाही.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘आयओए वैद्यकीय संघ, विशेषत: डॉ. पारडीवाला यांच्यावरील टीका अस्वीकार्य आणि निषेध करण्याजोगी आहे.’ पीटी उषा म्हणाल्या की, त्यांना आशा आहे की लोक ‘कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करतील’.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेशने अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढण्यामागे कोर्टात काय कारण सांगितलं? फोगटच्या वकिलांनी असा केला युक्तिवाद

पीटी उषा म्हणाल्या, ‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक भारतीय खेळाडूला अशा खेळांमध्ये स्वतःची सपोर्ट टीम असते. जे अनेक वर्षांपासून खेळाडूंसोबत काम करत आहेत. आयओएने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली होती, जी स्पर्धेदरम्यान आणि नंतर खेळाडूंच्या रिकव्हरी आणि दुखापतींच्या व्यवस्थापनासाठी मदत करेल. ज्या खेळाडूंकडे न्यूट्रिशनिस्ट आणि फिजिओथेरपिस्टची स्वतःची टीम नाही, अशा खेळाडूंना मदत करण्यासाठीही ही टीम तयार करण्यात आली होती.

हेही वाचा – Vinesh Phogat: रौप्यपदकाच्या प्रतिक्षेत असलेल्या विनेश फोगटला भारतात येताच देणार ‘सुवर्णपदक’, पाहा कोणी केली मोठी घोषणा?

विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या गटात अंतिम सामना गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून इतिहास घडवला. परंतु अंतिम फेरीपूर्वी तिचे वजन वाढले होते, अथक प्रयत्नांनंतरही विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. परिणामी विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित केले. यानंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (CAS) संयुक्त रौप्य पदक मिळावं, अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat and her coach is responsible for indian wrestler weight management ioa president pt usha statement paris olympics 2024 bdg