Vinesh Phogat appeals against Paris Olympic disqualification with CAS: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिच्याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त वजन असल्याने अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) कडे अपील केले आहे. अंतिम सामन्यादिवशी विनेशचे वजन फक्त १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सहभाग घेण्याची परवानगी मिळाली नाही. उपांत्य फेरीत ५-० अशा फरकाने विजय मिळवणारी विनेश ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती.

हेही वाचा – Vinesh Phogat: “पदक जिंकू शकले नाही हे दुर्देव पण…” ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
L K Advani Birth day Story
Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

विनेश फोगटने आता तिला संयुक्त रौप्य पदक मिळावं अशी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे मागणी केली आहे. CAS ने विनेशच्या बाजूने निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विनेशला संयुक्त रौप्यपदक द्यावे लागेल. विनेश फोगटने यापूर्वी अंतिम सामना खेळण्याची CAS कडे मागणी केली होती. परंतु तिला अंतिम फेरीत सामील करून घेण्याच्या आवाहनावर, सीएएसने सांगितले की ते अंतिम सामना थांबवू शकत नाही, त्यानंतर फोगटने संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली. आता CAS या प्रकरणावर गुरूवारी ८ ऑगस्टला अंतिम निर्णय देणार आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी…’, विनेश-निशासाठी पोस्ट करत सचिन तेंडुलकरही झाला भावूक, पाहा काय म्हणाला

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद म्हणजे काय? (What is CAS?)

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट CAS) ही एक स्वतंत्र संस्था आहे जी १९८४ मध्ये मध्यस्थीद्वारे खेळाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. याचे मुख्यालय लॉसने, स्वित्झर्लंड येथे आहे आणि न्यूयॉर्क शहर व सिडनी येथे न्यायालये आहेत. ऑलिम्पिक यजमान शहरांमध्ये तात्पुरती न्यायालये स्थापन केली आहेत.

हेही वाचा – Vinesh Phogat : “विनेशला रौप्य पदक द्या”, अमेरिकेच्या ऑलिम्पिकवीराची मागणी; नियम बदलाचा प्रस्ताव मांडत म्हणाला…

CAS कोणत्याही क्रीडा संस्थेपासून स्वतंत्र आहे आणि आंतरराष्ट्रीय लवाद परिषदेच्या (ICAS) प्रशासकीय आणि आर्थिक अधिकाराखाली कार्यरत आहे. CAS लवादाद्वारे खेळाच्या क्षेत्रातील कायदेशीर विवादांचे निराकरण केले जाते. काही वेळेस स्वित्झर्लंडच्या फेडरल सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाऊ शकते. लवाद समितीमध्ये प्रामुख्याने तीन न्यायाधीश असतात. निर्णय प्रक्रियेत, प्रत्येक पक्ष एक मध्यस्थ निवडतो, तर तिसरा संबंधित युनिटच्या अध्यक्षाद्वारे निवडला जातो. काही प्रकरणांमध्ये न्यायाधीश देखील नियुक्त केले जाऊ शकतात. CAS ने अनेक मोठ्या वादांमध्ये अंतिम निर्णय दिले आहेत.