Vinesh Phogat Celebrated RakshaBandhan Watch Video: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून भारतात परतल्यानंतर विनेश फोगटचे जबरदस्त स्वागत करण्यात आले. महिलांच्या ५० किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर विनेश शनिवारी भारतात परतली. नवी दिल्ली विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. विनेशचे कुटुंब राहत असलेल्या बलालीच्या वाटेवर हजारो लोकांनी तिचं स्वागत केलं. सोमवारी विनेश फोगटने ऑलिम्पिकची जर्सी घालून रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat: थकलेल्या विनेश फोगटला गावातील सत्कार समारंभादरम्यान आली चक्कर, VIDEO होतोय व्हायरल

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

विनेश तिच्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी हरियाणातील चरखी दादरी या गावी आली होती. विनेशने राखी बांधल्यानंतर भावासोबत मस्करीही केली. यावेळी तिचा भाऊ हरविंदर याने आयुष्यभराची कमाई भेट म्हणून दिली आहे, गेल्या वर्षी फक्त ५०० रुपये दिले होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनेश ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल हातात पकडलेलं दिसत आहे. व्हिडीओमध्ये विनेश म्हणताना दिसत आहे, “माझे वय ३० वर्षे आहे. गेल्या वर्षी माझ्या भावाने मला ५०० रुपये दिले होते. त्यानंतर यावर्षी हे नोटांचे बंडल… त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एवढेच पैसे कमावले आहेत आणि ते मला दिले.” असं विनेश मस्करीत बोलल्यावर विनेश हसायला लागली.

हेही वाचा – Rohit Sharma: “आमचं असंच चालतं…” रोहितचा धवल, नायरसह कॅफेमध्ये हटके सेल्फी, मराठमोळ्या मित्राच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश १७ ऑगस्टला मायदेशी परतल्यानंतर झालेल्या भव्य स्वागताने भारावून गेली. विनेश फोगट म्हणाली की, तिच्या बलाली गावातील महिला कुस्तीपटूंना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:हून अधिक यशस्वी करू शकले तर ती तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरअपात्र ठरलेल्या विनेशचे शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर जंगी स्वागत करण्यात आले.

हेही वाचा – Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल

विनेशने तिच्या अपात्रतेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या न्यायालयात अपील केले होते, परंतु तदर्थ विभागाने ते फेटाळले होते. दिल्लीहून तिच्या मूळ गावी बलालीला जाताना विनेशचा तिच्या समर्थकांनी आणि खाप पंचायतींनी सत्कार केला, १३५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी तिला सुमारे १३ तास लागले. मध्यरात्री ती तिच्या गावी पोहोचली. ग्रामस्थांनी तिचे तिथे जल्लोषात स्वागत केले. यादरम्यान थकलेल्या विनेशला चक्करही आली होती, ज्याचा फोटो, व्हीडिओ व्हायरल झाला होता.