Vinesh Phogat Coach on Weight Cut Before the Final of Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले. विनेश ५० किलो वजनी गटातील अंतिम फेरीचा सामना खेळण्यापूर्वी तिला अतिरिक्त १०० ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीपूर्वी विनेशचे वजन वाढले होते. विनेशसह तिचे कोच, सपोर्ट स्टाफ यांनी खूप मेहनत घेतली पण अखेरीस १०० ग्रॅम वजन जास्त आल्याने तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. विनेशने वजन कमी करताना काय संघर्ष केला याबाबत तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगटचे प्रशिक्षक, वोलर अकोस यांनी सांगितले की, ऑलिम्पिक फायनलच्या आदल्या रात्री साडेपाच तास वजन कमी करता करता त्या रात्री तिचा जीव गेला असता… अशी भीती त्यांना वाटत होती. विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर टीकेला सामोरे जावे लागलेले प्रशिक्षक अकोस यांनी गुरुवारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, दुसऱ्या दिवशी वजन करण्यापूर्वी टीमने शक्य ते सर्व प्रयत्न केले जेणेकरुन विनेश अंतिम फेरीत खेळू शकेल.

कोच वोलर अकोस यांनी एक फेसबुक पोस्ट करत विनेश फोगट वजन कमी करत असताना काय संघर्ष करत होती याबद्दल त्यांनी सांगितले पण नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. अकोस यांनी विनेश फोगटची तिचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी किती तत्पर होती, याबद्दल त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

अकोस फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, उपांत्य फेरीनंतर २.७ किलो अतिरिक्त वजन होते; एक तास वीस मिनिटे व्यायाम केला, पण १.५ किलो वजन अजूनही शिल्लक होते. नंतर, ५० मिनिट सौना बाथ घेतल्यानंतरही तिच्यावर घामाचा एक थेंबही दिसला नाही. कोणताही पर्याय उरला नव्हता आणि त्यानंतर मध्यरात्री ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत, तिने वेगवेगळ्या कार्डिओ मशीन्स आणि कुस्तीच्या मुव्हजवर केल्या, एकाच वेळी सुमारे पाऊण तास ही तेच करत होती, त्यातही फक्त दोन-तीन मिनिटे विश्रांती घ्यायची मग पुन्हा सुरूवात करायची. एकदा तर ती जमिनीवर कोसळली, पण कसे तरी आम्ही तिला उठवले आणि तिने सौनामध्ये एक तास घालवला. मी हेतुपुरस्सर नाट्यमय काहीतरी लिहित नाही, परंतु वजन कमी करता करता त्या रात्री तिचा जीव गेला असता, असे मला वाटत होते. ”

हेही वाचा – Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

प्रशिक्षकांनी पुढे सांगितले की, विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर तिला अश्रू अनावर झाले होते पण ती डगमगली नाही. “आम्ही त्या रात्री रूग्णालयातून परतताना बोलत होतो तेव्हा, विनेश म्हणाली, ‘कोच, दु: खी होऊ नका कारण तुम्ही मला सांगितले होते की जर मी कोणत्याही कठीण परिस्थितीत सापडले आणि मला जास्तीच्या उर्जेची गरज असेल, तर मी जगातील सर्वोत्तम महिला कुस्तीपटूला (जपानची युई सुसाकी) हरवले असा विचार माझ्या मनात असला पाहिजे. मी माझे ध्येय साध्य केले, मी सिद्ध केले की मी जगातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटूंपैकी एक आहे. गेमप्लॅन काम करतात हे आम्ही सिद्ध केले आहे. पदक, ऑलिम्पिक व्यासपीठ या भौतिक गोष्टी आहेत. कामगिरी हिरावून घेतली जाऊ शकत नाही, ”अकोस यांनी सांगितले.

विनेश फोगटसाठी ऑलिम्पिक पदक किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी, प्रशिक्षकांनी मागच्या वर्षी कुस्तीपटूंच्या आंदोलनातील एक किस्सा सांगितला, जेव्हा तिने बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या दोन्ही ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी हरिद्वार येथे आपली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. “विनेशने साक्षी आणि बजरंगला त्यांची मेहनतीने मिळवलेली ऑलिम्पिक पदकं नदीत विसर्जित करू नयेत अशी विनंती केली होती. तिने ही पदकं स्वतकडे ठेवावीत अशी विनंती केली होती, कारण ती विशेष आहेत. पण त्यांनी तिला समजावून सांगितले की हा प्रवास महत्त्वाचा आहे आणि त्यांची कामगिरी ही पदकांद्वारे अधोरेखित केली जात नाही,” त्याने लिहिले.

हेही वाचा – IND vs SL: सुपर ओव्हरचं विसरले अंपायर; भारत-श्रीलंका सामना राहिला टाय

विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये (CAS) संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी याचिका दाखल केली. तिची याचिका स्वीकारत त्यावर सुनावणीही सुरू झाली पण निकालाची तारीख मात्र पुढे ढकलली जात होती. १६ ऑगस्टला निकाल येईल असे क्रीडा लवादाने सांगितलेले असतानाच १४ ऑगस्टला तिची याचिका फेटाळल्याची माहिती देण्यात आली. यानंतर तिला पदक मिळेल याची आशा सरली. विनेशने कुस्तीच्या मॅटवरील तिचा जमिनीवर पडून डोळ्यावर हात घेत हात जोडलेला फोटो शेअर केला आहे.