Vinesh Phogat Denied to Challenge CAS Verdict Said Harish Salve: विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४ काँग्रेसच्या तिकिटावर लढवणार आहे. विनेशने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर गंभीर आरोप केले होते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान तिला कोणतीही मदत मिळाली नसल्याचे विनेशने सांगितले होते. विनेशने पीटी उषा यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. आता यावर विनेश फोगटची केस लढवणारे हरिश साळवे यांनी वक्तव्य दिले आहे.

पीटी उषा या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तिच्याबरोबर फक्त फोटो क्लिक करण्यासाठी आली होत्या, असे सांगितले होते. विनेशला त्या फोटो काढत होते हेही माहित नव्हते, असेही ती म्हणाली. विनेशचे कोर्टातील प्रकरणाचे प्रतिनिधित्व करणारे वकिल हरीश साळवे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

हेही वाचा – Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटूच्या अभिनेत्री सासूबाईंचा विराटबरोबर सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील कुस्ती स्पर्धेतील ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत विनेश फोगटने धडक मारली होती. पण अतिरिक्त वजनामुळे तिला संपूर्ण स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. विनेशने वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला यात पूर्ण यश मिळाले नाही. यानंतर तिने ऑलिम्पिक संघटनेच्या या निर्णयाविरोधात आंतररष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये याचिका दाखल केली. आठवड्याभराच्या सुनावणीनंतर कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आणि त्यामागचे कारणही स्पष्ट केले नाही.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत हरिश साळवे म्हणाले, “सुरूवातीला खूप गोंधळाची परिस्थिती होती. कोणाचाही कशाशी ताळमेळ बसत नव्हता. कारण भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेल्या खेळाडूंची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीतील काही वकिलांनी आम्ही तुमच्याशी काहीही शेअर करणार नाही असे सांगितले होते. आम्हाला संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळेपर्यंत उशीर झाला होता. पण आम्हाला संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तिला न्याय मिळेल यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न केले.”

हेही वाचा – ‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’

विनेश फोगटने पीटी उषा आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना तसेच भारतीय सरकारवर केलेल्या वक्तव्यावर वकिल हरिश साळवे पुढे म्हणाले, ”सर्वप्रथम तुम्ही पीटी उषा यांच्याशी बोलायला हवं. आम्ही तिच्यासाठी खूप प्रयत्न केला. आम्ही हे पुढे प्रकरण स्विस न्यायालयात नेणार असल्याचेही सांगितले. पण तिने याला नकार दिला आणि सरकारचा प्रश्न आहे तर भारत सरकारची या प्रकरणात कोणतीही भूमिका नव्हती.

हेही वाचा – IND vs PAK : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नाही तर…’, मोईन खानने दिला इशारा

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली. भारतात परतल्यानंतर तिच्या गावात बलाली येथे तिचा मोठ्या जल्लोषाच स्वागत केलं. तिच्या वाढदिवशी तिली खाप संघटनेने सुवर्णपदक देऊन तिचा गौरव केला होता. आता विनेश काँग्रेसकडून राजकारणाच्या रिंगणात उतरली आहे.