Vinesh Phogat appeals against Paris Olympic disqualification with CAS : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ही ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाली होती. मात्र अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम अधिक भरलं. त्यामुळे तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं. विनेश फोगटने याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (CAS) दाद मागितली आहे. विनेशने क्रीडा ऑलिम्पिककडे रौप्य पदकाची मागणी केली आहे. सीएएस (Court of Arbitration for Sport) विनेशच्या याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. भारताकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे हे विनेशची व भारतीय ऑलिम्पिक समितीची बाजू मांडणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता याप्रकरणी सुनावणी होईल. उपांत्य फेरीत ५-० अशा फरकाने विजय मिळवणारी विनेश ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती, मात्र अपात्रतेच्या कारवाईमुळे ती अंतिम सामना खेळू शकली नाही.

क्रीडा न्यायालयात याप्रकरणी गुरुवारी (८ ऑगस्ट) सुनावणी होणार होती. तसेच न्यायालयाने विनेशला तिची बाजू मांडण्यासाठी चार वकिलांचे पर्याय दिले होते. यामध्ये जोएल मोनलुइस, एस्टेले इव्हानोवा, हॅबिने एस्टेले किम आणि चार्ल्स एमसन यांचा समावेश होता. हे सर्व पॅरिस ऑलिम्पिकसाठी सीएएसचे निःशुल्क वकील आहेत. मात्र भारतीय ऑलिम्पिक समितीने आपली बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलांची नियुक्ती करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली. सीएएस आज दुपारी १.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) याप्रकरणी सुनावणी करेल. भारतीय ऑलिम्पिक समितीने याप्रकरणी हरिश साळवे यांची नियुक्ती केली असून ते सीएएससमोर विनेशची बाजू मांडतील. हरिश साळवे हे व्हर्च्युअल पद्धतीने या सुनावणीसाठी उपलब्ध असतील.

punjab and haryana high court
“फक्त घरात बसून राहणाऱ्या पत्नींना…”, पंजाब उच्च न्यायालयानं महिलेला फटकारलं; केला कलम १२५ चा उल्लेख!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Fraud Supreme Court Duplicate CJI Case freepik
Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा
Siddique Get Relief
Siddique Get Relief : मल्याळम अभिनेता सिद्दिकीला न्यायालयाचा दिलासा, बलात्कार प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळालं
supreme court on tirupati laddu row
Tirupati Laddu Row: “राजकारणापासून किमान देवांना तरी दूर ठेवा”, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; तिरुपती लाडू प्रकरणावर भाष्य!
cji dhananjay chandrachud karnataka high court judge vural video pakistan
Supreme Court Hearing: ‘पाकिस्तान’च्या उल्लेखावरून सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सुनावलं; म्हणाले, “भारतातल्या कोणत्याही भागाला…”
The Supreme Court refusal to stay the university assembly election process Mumbai
विद्यापीठ अधिसभा निवडणूक आजच; प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचाही नकार
Procedure in Legislature at legislative assembly
संविधानभान: विधिमंडळातील कार्यपद्धती

विनेशची मागणी काय?

विनेश फोगटने आता तिला संयुक्त रौप्य पदक मिळावं अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली आहे. CAS ने विनेशच्या बाजूने निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विनेशला संयुक्त रौप्यपदकाने सन्मानित करावं लागेल. विनेश फोगटने यापूर्वी अंतिम सामना खेळण्याची CAS कडे मागणी केली होती. परंतु तिला अंतिम फेरीत सामील करून घेण्याच्या आवाहनावर, सीएएसने सांगितले की ते अंतिम सामना थांबवू शकत नाहीत, त्यानंतर फोगटने संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली. आता CAS या प्रकरणावर गुरूवारी ८ ऑगस्टला अंतिम निकाल जाहीर आहे.

हे ही वाचा >> Neeraj Chopra : “नीरजच्या रौप्य पदकामुळे…”, पंतप्रधान मोदींची शाबासकी; म्हणाले, “देशातील नव्या खेळाडूंसाठी…”

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद म्हणजे काय? (What is CAS?)

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट CAS) ही एक स्वतंत्र संस्था आहे जी १९८४ मध्ये मध्यस्थीद्वारे खेळाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाताचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने या शहरात आहे. तसेच न्यूयॉर्क व सिडनी येथे क्रीडा लवादाची अन्य न्यायालये आहेत. तसेच ऑलिम्पिकचं आयोजन ज्या शहरांमध्ये केलं जातं तिथे तात्पुरतं न्यायालय स्थापन केलं जातं.