Vinesh Phogat disqualification case update : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा संपल्यानंतरही अजून कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणाचा निर्णय अजून यायचा आहे. क्रीडा लवाद न्यायालय (सीएएस) मंगळवारी (१३ ऑगस्ट) आपला निर्णय जाहीर करणार होता, परंतु आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. आता न्यायालयाचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता येणार आहे. हा निर्णय विनेशच्या बाजूने आल्यास तिला रौप्यपदक मिळेल. मात्र, जर निर्णय तिच्या विरोधात आला तर विनेशसह सर्व भारतीयांची निराशा होईल.

या निर्णयाचा सविस्तर आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. यापूर्वी सीएएसने निकाल देण्याची तारीख १० ऑगस्ट ठेवली होती. सहसा या पॅनेलला निर्णय देण्यासाठी २४ तास दिले जातात. मात्र, या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी बराच वेळ घेतला जात आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओअ) च्या निवेदनानुसार, ‘क्रीडा लवादाच्या ॲड-हॉक विभागाच्या अध्यक्षांनी विनेश फोगट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंगमध्ये त्यांचा निर्णय देण्यासाठी एकमेव मध्यस्थ डॉ. ॲनाबेले बेनेट यांची नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा खटला शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिसच्या वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत निर्णय देण्याचा अवधी दिला आहे.’

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!

सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरविले –

शेवटी, हे प्रकरण काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली? खरेतर, पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान, विनेशने ६ ऑगस्ट रोजी सलग ३ सामने जिंकून ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदक निश्चित केले होते. कारण सुवर्णपदकाचा सामना ७ ऑगस्टच्या रात्री होणार होता, पण त्याच दिवशी सकाळी विनेशला अपात्र ठरवण्यात आले कारण सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. यानंतर विनेशने सीएएसमध्ये याचिका दाखल केली.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

पहिल्यांदा तिला सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही तिची पहिली मागणी होती. मात्र नियमांचा हवाला देत तिची मागणी तात्काळ फेटाळण्यात आली. यानंतर विनेशने तिला या स्पर्धेत रौप्यपदक मिळावी, अशी विनंती केली. यावर क्रीडा लवादाकडून १० ऑगस्टल निर्णय येणार होता. मात्र, तो नंतर २४ तासांनी पुढे म्हणजे ११ ऑगस्टवर ढकला. यानंतर हा निर्णय ११ वरुन १३ आणि आता १६ ऑगस्टवर गेला ढकलण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा विनेशकडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat : रौप्यपदकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विनेश फोगटची एकूण संपत्ती किती आहे माहितेय का? जाणून घ्या

विनेश फोगट अपात्र प्रकरणावर निर्णय देणारे CAS नेमकं काय?

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी क्रीडा विश्वातील कोणत्याही वादावर तोडगा काढण्याचे काम करते. या न्यायालयात केवळ खेळाडू आणि प्रशिक्षक कोणत्याही प्रकारच्या निर्णयाविरुद्ध किंवा इतर कोणत्याही वादाच्या बाबतीत अपील करू शकतात. सीएएसमध्ये ८७ देशांतील अंदाजे ३०० मध्यस्थ आहेत, त्यांची निवड क्रीडा कायद्याच्या तज्ञ ज्ञानासाठी केली आहे. विनेश फोगटशी संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही या न्यायालयाचे नाव प्रथमच ऐकले असेल, परंतु सीएएसमध्ये दरवर्षी सुमारे ३०० प्रकरणे नोंदवली जातात.

हेही वाचा – Olympics : विनेश फोगटचं रौप्य पदक निश्चित? पराभवानंतरही ‘या’ खेळाडूला मिळालं पदक, क्रीडा लवादाचा निर्णय

कुस्तीपटू विनेशने कुस्तीतून घेतली निवृत्ती –

७ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीचा अंतिम सामना खेळला गेला. यानंतर दुसऱ्याच दिवशी विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही माहिती दिली. विनेश फोगट म्हणाले की, “आई, आज कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलं नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ मी तुझी कायमच ऋणी राहिन मला माफ कर”, असं म्हणत कुस्तीला आई समान मानत विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतला आहे.

Story img Loader