Vinesh Phogat Disqualification Case Update : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक द्यावे की नाही? याबाबतच्या अपीलावर निर्णय घेण्यासाठी क्रीडा लवादाने आणखी २४ तासांची मुदतवाढ दिली आहे. आता याप्रकरणी ११ ऑगस्टला निर्णय अपेक्षित आहे. यापूर्वी, सीएएसने शनिवारी रात्री ९.३० वाजेपर्यंत आपला निर्णय जाहीर करण्याची घोषणा केली होती. पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलच्या दिवशी सकाळी १०० ग्रॅम जास्ता वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर, विनेश फोगटने त्याविरुद्ध कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) कडे अपील करत संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली होती.

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून शनिवारी निर्णय अपेक्षित होता. मात्र, आता तो निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सकारात्मक तोडगा काढण्याची आशा व्यक्त केली होती. उपांत्य फेरीत तिच्याकडून पराभूत झालेल्या विनेशच्या जागी क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन लोपेझने अंतिम फेरीत प्रवेश केला. आपल्या अपीलमध्ये भारतीय कुस्तीपटूने लोपेझसोबत संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली होती.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,

विनेश फोगट प्रकरणासाठी २४ तासांची मुदतवाढ –

जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विनेश फोगट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती या प्रकरणात एकमेव लवाद माननीय डॉ. ॲनाबेले बेनेट यांना निर्णय जारी करण्यासाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळ वाढवली आहे. त्यामुळे आता विनेश फोगटच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी येईल. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) ने विनेश फोगटला ५० किलो गटातील महिला कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवले होते. कारण तिचे वजन निर्धारित मानकांपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले होते. विनेश फोगट आणि यूडब्ल्यूडब्ल्यू या दोघांनाही त्यांचे वकील निवडण्याची संधी देण्यात आली.

हेही वाचा – Aman Sehrawat : अमन सेहरावतने ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्यापूर्वी अवघ्या १० तासात ४.६ किलो वजन कसे घटवले? जाणून घ्या

विनेशने तिच्या अपात्रतेविरुद्ध ७ ऑगस्ट रोजी अपील दाखल केली होती आणि गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ती स्वतः हजर होती. वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी भारतीय कुस्तीपटूच्या वतीने युक्तिवाद केला होता. त्यानंतर यूडब्ल्यूडब्ल्यूनेही आपली बाजू मांडली आणि सुमारे एक तास सुनावणी चालल्याचे सांगण्यात आले होते.

हेही वाचा – Paris Olympics 2024 Closing Ceremony : ऑलिम्पिक क्लोजिंग सेरेमनी कधी, कुठे, किती वाजता सगळं काही जाणून घ्या

विनेश फोगट अपात्र प्रकरणावर निर्णय देणारे CAS नेमकं काय?

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी क्रीडा विश्वातील कोणत्याही वादावर तोडगा काढण्याचे काम करते. या न्यायालयात केवळ खेळाडू आणि प्रशिक्षक कोणत्याही प्रकारच्या निर्णयाविरुद्ध किंवा इतर कोणत्याही वादाच्या बाबतीत अपील करू शकतात. सीएएसमध्ये ८७ देशांतील अंदाजे ३०० मध्यस्थ आहेत, त्यांची निवड क्रीडा कायद्याच्या तज्ञ ज्ञानासाठी केली आहे. विनेश फोगटशी संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही या न्यायालयाचे नाव प्रथमच ऐकले असेल, परंतु सीएएसमध्ये दरवर्षी सुमारे ३०० प्रकरणे नोंदवली जातात.

Story img Loader