Vinesh Phogat disqualified Swara Bhaskar raised questioned : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपात्र घोषित करण्यात आल्याची बातमी येताच, तमाम देशवासीयांना मोठा धक्का बसला. असे काही घडू शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. विनेश फोगटने महिला कुस्तीच्या ५० किलो गटात अंतिम फेरी गाठून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. ज्यामुळे सर्वांच्या नजरा आता अंतिम सामन्याकडे लागल्या होत्या. मात्र याआधीच विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले, ज्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या पदकाच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही विनेश फोगटच्या अपात्रतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
विनेश फोगटचे वजन ५० किलो महिलांच्या कुस्ती सामन्यासाठी निर्धारित मानकापेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. विनेशने ते कमी करण्याचा प्रयत्न केला. ती रात्रभर सायकलिंग आणि स्किपिंग करत राहिली. पण आता ७ ऑगस्टला होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन वाढले, त्यामुळे तिला सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. यावर आता सर्व स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर या अपात्रतेमागे काही षडयंत्र असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता अशात अभिनेत्री स्वरा भास्करचे ट्वीट व्हायरल होत आहे.
स्वरा भास्करने ट्वीटकवर उपस्थित केला प्रश्न –
स्वरा भास्करने एक्सवर लिहिले की, ‘या १०० ग्रॅम जास्त वजनाच्या कथेवर तुमचा विश्वास आहे का?’ स्वराचे हे ट्विट व्हायरल होत असून त्यावर युजर्सकडून अनेक कमेंट्स येत आहेत. विनेश फोगटच्या अपात्रतेच्या विरोधातही ते व्यक्त होत आहेत. काही युजर्सनी पॅरिस ऑलिम्पिकच्या मानकांवरही टीका केली. एकाने लिहिले, ‘एका मुलाने मुलगी असल्याचे भासवले आणि खेळला, तेव्हा त्यांचे कोणतेही पॅरामीटर काम करत नव्हते. मात्र, आता त्यांचे अपात्रचे प्रत्येक पॅरामीटर कार्यरत आहेत. व्वा.’
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इमेन खलिफवरून झाला होता वाद –
पॅरिस ऑलिम्पिकम २०२४ मध्येच अल्जेरियन बॉक्सर इमेन खलिफ लिंग वादात सापडल्याची माहिती आहे. इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनीने तिच्या महिला असण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. सामन्यादरम्यान इमेन खलिफने कॅरिनीला जोरात ठोसा मारला, त्यामुळे तिचे नाक तुटले. यानंतर कॅरिनीने सामना सोडला. इमान खलिफच्या लिंगाबाबत बराच गदारोळ झाला होता, पण पॅरिस ऑलिम्पिकने कोणतीही कारवाई केली नाही. आता फक्त १०० ग्रॅम जास्तीच्या वजनासाठी विनेश फोगटवर कारवाई केल्यामुळे यूजर्स संतापले आहेत.
विनेशकडून पराभूत झालेली खेळाडू खेळणार सुवर्णपदकाचा सामना
७ ऑगस्टला भारताला सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळणार हे निश्चित होतं, पण तितक्यातच सकाळी विनेश फोगटबाबत एक मोठी बातमी येऊन धडकली. अतिरिक्त वजनामुळे विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित केले. तिचे वजन केवळ १०० ग्रॅमने जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. कुस्तीच्या नियमानुसार अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटला कोणतेही पदक मिळणार नाही.
हेही वाचा – Vinesh Phogat Replacement: विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने ‘ही’ खेळाडू खेळणार अंतिम फेरीचा सामना
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनुसार, विनेश फोगटचा उपांत्य फेरीत क्युबाच्या खेळाडूचा पराभव केला होता, आता तिलाच अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. विनेशने क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव केला होता. आता तिचा अंतिम फेरीत लढत अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिल्डेब्रंटशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनुसार, विनेश फोगटने उपांत्य फेरीत जिचा पराभव केला होता, आता तिला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd