Vinesh Phogat in Olympic 2024: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीआधी वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे तिचं आणि पर्यायाने भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं आहे. पण फक्त १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेश फोगटला ऑलिम्पिकसारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवणं चुकीचं असल्याचं मत आता व्यक्त होऊ लागलं आहे. काही राजकीय नेते व खेळाडूंनी यामागे कट-कारस्थान असल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे विनेश फोगटवरची अपात्रता कारवाई चर्चेत आली आहे. त्यावर आता भारताचा ऑलिम्पिकपटू विजेंदर सिंग यानं संताप व्यक्त केला आहे.

Vinesh Phogat वर नेमकी काय कारवाई?

विनेश फोगट यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजनी गटात खेळत आहे. विनेश या गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिच्या अंतिम सामन्याआधी तिच्या वजनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यामध्ये तिचं वजन ५० किलोच्या फक्त थोडं जास्त असल्याचं दिसून आलं. काही दाव्यांनुसार हे वजन फक्त १०० ग्रॅम इतकं जास्त होतं. त्यामुळे विनेश फोगट फक्त सुवर्णपदकच नव्हे, तर या वजनी गटाच्या कांस्य पदकच्या शर्यतीतूनही विनेश फोगट बाहेर पडली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Two youths die while performing stunts on two wheelers after drinking alcohol
नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू
internet user on vinesh phogat disqualified
विनेश फोगाट फायनल साठी अपात्र ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

“१०० ग्रॅमसाठी कुणी अपात्र ठरू शकत नाही”

विनेश फोगटवर करण्यात आलेल्या कारवाईवरून आता बॉक्सर विजेंदर सिंगनं त्यावरून गंभीर दावा केला आहे. “मी कधी हे असं कधी ऐकलं नव्हतं, कधी पाहिलं नव्हतं. मी तीन ऑलिम्पिकमध्ये खेळलो आहे. मी माझ्या इतर सहकारी बॉक्सिंग खेळाडूंशी बोललो. त्यांनीही सांगितलं की असं होत नाही. १०० ग्रॅमसाठी तुम्हाला काढलं जाऊ शकत नाही”, असं विजेंदर सिंगनं आयएएनएसला दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केलं आहे.

एकदा वजन जास्त भरल्यास दुसरी संधी दिली जाते?

“खेळात बऱ्याच तांत्रिक बाबी असतात ज्या सगळ्यांना माहिती नसतात. तिथे दोन वजन करण्याच्या मशीन असतात. आधी ट्रायल वेट होतं. तिथे तुमचं वजन नोंदवतात. नंतर अंतिम वजन करण्यासाठी खेळाडू जातात. १०० ग्रॅम वजन जास्त असेल तर त्या खेळाडूला एक संधी दिली जाते. त्याला सांगितलं जातं की तुम्ही ३० मिनीट घ्या. तुमचं पुन्हा वजन करू. त्यामुळे ही काही फार मोठी बाब नाही. पण त्या खेळाडूला अपात्र करणं हा खूप कठोर निर्णय आहे. हा असा निर्णय का घेतला गेला हे मला कळत नाही”, असं विजेंदर सिंगनं नमूद केलं आहे.

“आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये असं काही पाहिलेलं नाही. पण पहिल्यांदाच हे दिसतंय. हे कुणी केलंय, का केलंय माहिती नाही. हा भारताविरुद्ध कट आहे असं आम्हाला वाटतंय. तिथे भारताकडून जे कुणी पदाधिकारी गेले आहेत, त्यांनी तिथे या गोष्टीवर आक्षेप नोंदवायला हवा की भारत या निर्णयामुळे अजिबात समाधानी नाही. जी काही कठोर पावलं उचलता येतील ती उचला”, असंही विजेंदर सिंग म्हणाला.

“सरळ बॅगा उचला आणि परत या”

“जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं ऐकलं जात नाहीये तर बॅग उचला आणि भारतात परत या. त्यांना कळलं पाहिजे की भारत काही फुकट इथपर्यंत आलेला नाही. आम्ही उत्तम खेळाडू आहोत. म्हणून आम्ही पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही ते सिद्ध केलं. फक्त १०० ग्रॅम वजन जास्त झालं म्हणून तुम्हाला लगेच अपात्र केलं असं नाही होऊ शकत”, अशा शब्दांत विजेंदर सिंगनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Bajrang Punia On Vinesh Phogat : विनेश फोगटच्या वजनाबाबत बजरंग पुनियाने आधीच व्यक्त केली होती शंका; नेमकं काय म्हटलं होतं?

“मला वाटतं तुम्ही निषेध नोंदवा. तुमचा आक्षेप योग्य असेल तर तुम्हाला खंबीर निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही ऑलिम्पिक बॉयकॉट करायला हवं. आपली झोळी एवढी काही भरलेली नाही. २-३ मेडल आले होते फक्त. आणखी २-३ आले असते तर आपण खूश झालो असतो. पण जर तुमचा मुद्दा बरोबर आहे, तर या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. या सगळ्यावर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. फक्त गप्पांनी काहीही होणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका विजेंदर सिंगनं मांडली आहे.

Story img Loader