Vinesh Phogat Disqualified Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केले होते. नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
Ballarpur paper industry in crisis 347 out of 900 paper mills closed
बल्लारपूर पेपर उद्योग संकटात, ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद
Bombay High Court ordered closure of 102 spinning factories over Khair smuggling
रत्नागिरी जिल्ह्यातील काताचे अवैध कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

‘कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्देवी गोष्ट’, असं भारतीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतीय चमूने रात्रभरात तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय पथक यासंदर्भात याव्यतिरिक्त काहीही भाष्य करणार नाही. विनेशच्या खाजगीपणाचा अधिकार जपावा अशी विनंती भारतीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, भारतीय शिष्टमंडळाने तिला १०० ग्रॅम वजन कमी करण्याची अखेरची संधी मिळावी यासाठी आणखी काही वेळ मागितला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. फोगट पहिल्यांदाच ५० किलो वजनी गटात खेळतेय असं नाही. ती सहसा ५३ किलो वजनी गटात खेळताना दिसते. पण तिचे वजन ५३ किलोच्या तुलनेतही कमी आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीतही तिला अशाच परीक्षेला सामोरे जावे लागले, तिथे ती थोडक्यासाठी पात्र ठरली.

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून मोठा धक्का दिला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले होते. संपूर्ण सामन्यात विनेश फोगट २-० ने पिछाडीवर सामना अवघ्या काही सेकंदांवर येऊन पोहोचला होता. विनेश पराभूत होणार असंच दिसत होतं, पण शेवटची १० सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेशने सामना पालटला आणि ३-२ फरकाने दणदणीत विजय मिळवला.

तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या विनेशने तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि शेवटच्या पाच सेकंदात जपानच्या चॅम्पियन कुस्तीपटूला नमवून दोन गुण मिळवण्यात यश मिळवले. जपान संघानेही या विरोधात अपील केले पण रेफ्रींनी व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर तो फेटाळला, त्यामुळे विनेशला आणखी एक गुण मिळाला आणि तिने ३-२ असा विजय मिळवला. यानंतर युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. लिवाचने खूप प्रयत्न केले पण शेवटी विनेशने (Vinesh Phogat) आपली पकड मजबूत ठेवत विजय मिळवला. विनेशने उपांत्यपूर्व सामना ७-५ च्या फरकाने जिंकला.

Story img Loader