Vinesh Phogat Disqualified : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली आहे. १०० ते १५० ग्रॅमच्या अतिरिक्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर भारतीयांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु, २४ तासांच्या आतच भारतीयांच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या. विनेश फोगट अपात्र ठरल्याने ती कोणत्याच पदकासाठी आता खेळू शकणार नाही. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी विनेश फोगटची भेट घेऊन निवेदन सादल केलं आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पी. टी. उषा काय म्हणाल्या?

“विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. मी तिला ऑलिम्पिक व्हिलेज क्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA), भारत सरकार आणि संपूर्ण देशाकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व प्रकारचे वैद्यकीय आणि भावनिक समर्थन देत आहोत”, असं पी. टी. उषा म्हणाल्या.

Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

हेही वाचा >> Vinesh Phogat : “वजन कमी केलं तरी तोंडावर कंट्रोल…”, अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटबाबत हिंदकेसरी दीनानाथ सिंग काय म्हणाले?

“भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी UWW ला अर्ज केला आहे. IOA शक्य तितक्या पद्धतीने याचा पाठवपुरावा करणार आहे. डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्या नेतृत्त्वाखालील वैद्यकीय पथक आणि शेफ-डी-मिशन गगन नारंग यांच्याकडून तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं”, असं या निवेदनात म्हटलं आहे.

वजन कमी करताना कमकुवतपणा येतो

“दलाचे मनोबल वाढवण्याकरता भारतीय ऑलिम्पिक संघटना प्रत्येक पाऊल उचलत आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व भारतीय विनेश आणि दलाच्या पाठीशी आहे. कुस्तीगीर सहसा त्यांच्या नैसर्गिक वजनापेक्षा कमी वजनाच्या गटात भाग घेतात. कमी बलवान असलेल्या विरोधकांशी लढायला यामुळे सोपं जातं. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सकाळचे वजन होईपर्यंत व्यायाम, अन्न-पाणी घेण्यास वर्ज्य असतं. वजन कमी करताना कमकुवतपणा येतो आणि ऊर्जा कमी होते. त्यामुळे पुन्हा ऊर्जा मिळवण्याकरता मर्यादित पाणी, सकस आहार दिला जातो”, असं स्पष्टीकरणही यात दिलं होतं.

“डिहायड्रेशन टाळण्यासाठी विनेशला थोडंसं पाणी दिलं होतं. त्यामुळे तिचं वजन वाढलं. याच काळात तिचं वजन कमी होण्याकरताही प्रशिक्षकाने प्रयत्न केले. परंतु, तरीही विनेशचे वजन ५० किलो वजनाच्या श्रेणीपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. केस कापण्यापासून इतर सर्व पर्यायी उपाय करण्यात आले होते. तरीही तिचं वजन ५० किलोपेक्षा जास्तीचे भरले”, असंही या निवेदनात आहे.