Vinesh Phogat Exhausted and Faints During Village Celebrations Video: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील धक्कादायक अनुभवानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट १८ ऑगस्टला मायदेशी परतली. भारतात आल्यावर विनेशचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली विमानतळापासून ते तिच्या गावी बलाली येथे पोहोचेपर्यंत चाहत्यांनी विनेशला भरभरून प्रेम दिले. गावात पोहोचल्यानंतरही विनेशचा मोठा मान सन्मान करण्यात आला आणि याच दरम्यान तिची प्रकृती खालावली. तिला चक्कर येत असल्याचेही दिसले.

हेही वाचा – Vinesh Phogat Coach: “त्या रात्री तिचा जीव गेला असता…” विनेश फोगटच्या कोचने अंतिम फेरीपूर्वी वजन कमी करतानाचा सांगितला प्रसंग

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

विनेशला चक्कर येत असल्याचा व्हिडिओही समोर आला होता, विनेशला तिच्या हरियाणातील बलाली गावात सन्मानित करण्यात आले होते. विनेशला तिचे समर्थक आणि गावातील खाप पंचायत सदस्यांनी सुवर्णपदक देऊन गौरविले. या सोहळ्यादरम्यान विनेशने सर्वांशी संवादही साधला पण एकूणच प्रवास आणि रॅलीनंतर ती थकलेली असल्याने तिला चक्कर येत होती. २० तासांच्या प्रवासानंतर विनेश दिल्ली विमानतळावर पोहोचली आणि त्यानंतर दिल्ली ते तिचं गाव बलालीपर्यंत तिची विजयीयात्रा काढण्यात आली होती. या मोठ्या प्रवासानंतर तिच्या सत्कार समारंभात विनेश थकलेली दिसली.

हेही वाचा – Rohit Sharma: “आमचं असंच चालतं…” रोहितचा धवल, नायरसह कॅफेमध्ये हटके सेल्फी, मराठमोळ्या मित्राच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

विनेशच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सत्कार समारंभात विनेशची तब्येत ठीक नसल्याचे दिसत आहे आणि तिच्याभोवती बरेच लोक बसलेले दिसत आहेत, ज्यात कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील आहे. तर बाजूला काका महावीर फोगटही तिची विचारपूस करत होते. या मोठ्या दिवसानंतर थकलेल्या विनेश फोगट सर्वांशी संवाद साधत असताना तिला ओआरएसही देण्यात आले जेणेकरून ती सर्वांसमोर आपले मनोगत मांडेल. विनेशचा पती सोमवीर राठीसुद्धा तिथे तिच्यासह उपस्थित होता.

हेही वाचा – Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची तारीख ठरली! १० महिन्यांनंतर ‘या’ स्पर्धेत खेळणार पहिला सामना

पॅरिसहून भारतात आल्यावर, विनेशने प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्या बलाली गावातील महिला कुस्तीपटूंना प्रशिक्षण देऊ शकले तर ती तिच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल, असेही ती म्हणाली.

विनेश म्हणाली, “या गावातून एकही कुस्तीपटू उदयास आली नाही तर निराशा होईल. आम्ही आमच्या यशाने मार्ग तयार केला आहे आणि आशाही दाखवली आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की या गावातील महिलांना पाठिंबा द्या. भविष्यात त्यांना यश मिळवायचे असेल, जर त्यांना आमची जागा घ्यायची असेल तर त्यांना तुमचा पाठिंबा, आशा आणि विश्वास हवा आहे.”