Vinesh Phogat First Photo after disqualification from Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत तिचा चेहरा हसरा दिसत असला तरी तिच्या हास्यामागे दडलेलं दुःख व यातना स्पष्ट दिसत आहेत. भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (IOA) अध्यक्षा पी. टी. उषा तिला धीर देताना दिसत आहेत. यावेळी पी. टी. उषा यांनी विनेशशी सविस्तर चर्चा केली, तिला धीर दिला. ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर विनेश मानसिकरित्या कोलमडली होती. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. मात्र ती मानसिकरित्या खूपच निराश आहे. ही तिची तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती आणि ऑलिम्पिक पदकांची तिची पाटी अद्याप कोरीच आहे. यंदा तिला सुवर्ण पदक किंवा रजत पदक पटकावण्याची संधी होती. मात्र परिस्थितीने तिची ही संधी हिरावली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिचं वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅमने अधिक असल्यामुळे तिला अंतिम लढतीपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेशकडून देशाला सुवर्णपदकाची आशा होती. मात्र, लहानशा चुकीची तिला व भारताला मोठी किंमत मोजावी लागली आहे. महिलांच्या ५० किलो वजनी गटात अनेक मातब्बर महिला कुस्तीपटूंवर मात करत विनेशने अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन तपासण्यात आलं तेव्हा ते ५० किलो १५० ग्रॅम भरलं. ५० किलो १०० ग्रॅमपर्यंत वजन असल्यास खेळाडू पात्र ठरू शकतो. मात्र अवघ्या ५० ग्रॅम वजनामुळे तिचं आणि देशाचं स्वप्न भंगलं आहे. विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आणि भारताने ‘सुवर्ण’संधी गमावली.

kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
strawberry season start late by 15 days leading to limited market supply
बदलत्या हवामानाने स्ट्रॉबेरीचा हंगामाला विलंब
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
Vinesh Phogat first photo
अपात्रतेनंतर कुस्तीपटू विनेश फोगटचा पहिला फोटो समोर (PC : ANI)

वजन कमी करण्यासाठी विनेशची धडपड

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री विनेशने (Vinesh Phogat) तिचं वजन तपासलं तेव्हा ते ५२ किलो भरलं. त्यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. ती बराच वेळ धावली, दोरीवरच्या उड्या मारल्या, त्यानंतर काही वेळ सायकल चालवली. ती एवढ्यावरच थांबली नाही. तिने तिचे केसही कापले, नखं कापली, काही प्रमाणात रक्त देखील काढलं. अखेर व्हायचं तेच झालं. अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन तपासलं तेव्हा ते ५० किलो १५० ग्रॅम इतकं भरलं. विनेश आणखी ५० ग्रॅम वजन कमी करू शकली असती तर ती अंतिम सामन्यासाठी पात्र ठरली असती व तिने भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथं पदक जिंकलं असतं. ती जिंकली असती तर तिला सुवर्णपदक मिळालं असतं आणि ती पराभूत झाली असती तर तिला रजत पदकावर समाधान मानावं लागलं असतं.

हे ही वाचा >> Vinesh Phogat Disqualified: “विनेश फोगटकडून काहीतरी चूक…”, बॅडमिंटनपटू, भाजपा नेत्या सायना नेहवालचं मोठं वक्तव्य

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले, प्रशिक्षक व आहारतज्ज्ञ काय करत होते?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले, “विनेशने खूप चांगला खेळ सादर केला व ती या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली, त्यानंतर ती अपात्र ठरली आहे, ही गोष्ट आपल्या देशासाठी खूप दुर्दैवी आहे. केवळ १०० गॅम वजन अधिक असल्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं. भारत सरकारने विनेशला प्रशिक्षक, आहार तज्ज्ञ आणि फिजिओ प्रदान केले आहेत. हे सर्वजण तिच्याबरोबर पॅरिसमध्ये आहेत. विनेशचं वजन वाढलेलं असताना प्रशिक्षक व आहारतज्ज्ञ काय करत होते?