Vinesh phogat Reaction on disqualification in Paris Olympics 2024: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. अंतिम सामन्यापूर्वी अतिरिक्त वजन असल्यामुळे ऑलिम्पिकमधून विनेश अपात्र ठरली. विनेश फोगटचे वजन १०० ग्रॅमने जास्त असल्याने ती निर्धारित मानकांची पूर्तता करू शकली नाही. आता ती पदक न घेता पॅरिसहून परतणार आहे. या घटनेनंतर विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डिहायड्रेशनमुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता विनेशने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.

हेही वाचा – Vinesh Phogat : “विनेशला रौप्य पदक द्या”, अमेरिकेच्या ऑलिम्पिकवीराची मागणी; नियम बदलाचा प्रस्ताव मांडत म्हणाला…

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

Vinesh Phogat ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर काय म्हणाली?

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा आणि डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्यानंतर विनेशचे प्रशिक्षक विनेशला रुग्णालयात भेटण्यासाठी पोहोचले. महिला खेळाडूंचे राष्ट्रीय प्रशिक्षक वीरेंद्र दहिया आणि मनजीत राणी यांनी विनेशसोबत झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वीरेंद्र दहिया म्हणाले- विनेशला अपात्र घोषित केल्यानंतर कुस्तीच्या विभागात खळबळ उडाली होती. या बातमीनंतर इतर कुस्तीपटू मुलीही खचल्या होत्या. आम्ही विनेशला भेटलो. आम्हीही तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. ती एक धाडसी मुलगी आहे. विनेशने आम्हाला सांगितले- “आपण पदक जिंकू शकलो हे खरंच दुर्दैव आहे, पण हा खेळाचा एक भाग आहे.”

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी…’, विनेश-निशासाठी पोस्ट करत सचिन तेंडुलकरही झाला भावूक, पाहा काय म्हणाला

प्रशिक्षक म्हणाले की, विनेशच्या अपात्रतेनंतर संघातील इतर खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. प्रशिक्षकाच्या म्हणण्यानुसार, अंतिम पंघललाही आपला खेळ नीट करता आला नाही. ती तिच्या लयीत खेळताना दिसली नाही. पीटी उषा विनेश फोगटला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या, ज्याचे फोटोही समोर आले होते. पीटी उषाने तिच्यासोबतच्या भेटीनंतर सांगितले होते की ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे, परंतु पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने निराश झाली आहे. त्या म्हणाल्या- विनेशचे वजन २.५ किलोने कमी करण्याचे प्रयत्न सुरू होते.

पीटी उषा म्हणाल्या की, विनेशचे प्रकरण युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) समोर ठेवण्यात आले आहे. पण UWW चं म्हणणं आहे की नियम हे नियम आहेत. या प्रकरणात काहीही करता येणार नाही. विनेशचे वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे डॉ.पारडीवाला यांनी सांगितले. तिच्या आहाराची पूर्ण काळजी घेण्यात आली. तिचे केसही कापले गेले, कपडे छोटे केले गेले, परंतु तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त आले.

तिसऱ्या ऑलिम्पिकमध्येही पदरी निराशा

विनेश तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. रिओ ऑलिम्पिक २०१६ मधील तिच्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये, तिला मोठ्या दुखापतीमुळे स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात नेण्यात होते, तर टोकियोमधील तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीस तिला निराशाजनक पराभवाला सामोर जावे लागले होते. विनेश (२९) हिला सकाळी डिहायड्रेट झाल्यामुळे खेळगाव येथील पॉली क्लिनिकमध्ये नेण्यात आले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी विनेशला प्रोत्साहन दिले आणि ती भारताची शान आहे आणि तिला जोरदार कमबॅच करायचे आहे, असे सांगितले.

Story img Loader