Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ( Vinesh Phogat ) भारतात येण्यासाठी पॅरिसमधून निघाली आहे. ५० किलो वजनी गटात कुस्ती खेळण्यासाठी तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र तिचं वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. तिला रौप्य पदक देण्यात यावं अशी मागणी केली जाते आहे. अशात आता तिच्या अपात्रतेचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा कोर्टाने १३ ऑगस्ट म्हणजेच आज मंगळवारपर्यंत राखून ठेवला आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा निकाल जाहीर होणार आहे. विनेशचा पॅरिस सोडतनाचा व्हिडीओ समोर आला आहे.

विनेश फोगट आज मायदेशी परतणार

विनेश फोगट पॅरिसहून भारतासाठी रवाना झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतसह विनेश फोगट दिल्लीत दाखल होणार आहे. विनेश फोगट ( Vinesh Phogat ) आज भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. सीएएसने अद्याप कोणताही निर्णय न दिल्यामुळे विनेश फोगट पदक न घेताच मायदेशी परत असल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हा ती कुस्तीच्या अंतिम फेरीत जाऊन अपात्र ठरली तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिच्यासह सगळा देश हळहळला. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने कुस्तीला अलविदा केला.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Rohit Sharma was going to retire after the Melbourne Test but A well wisher forced to change of decision
Rohit Sharma : रोहित शर्मा मेलबर्न कसोटीनंतर घेणार होता निवृत्ती; कोणामुळे बदलला निर्णय? जाणून घ्या

हे पण वाचा- Vinesh Phogat : तीनवेळा मोडलेलं पदकाचं स्वप्न, विनेशचं कुस्ती सोडणं आणि तिच्या मनातली अश्वत्थाम्याची जखम

विनेशने उत्तम खेळ केला पण..

विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चार वेळा विश्वविजेती आणि गत ऑलिम्पिक चॅम्पियन जपानची युई सुसाकी हिचा पहिल्याच फेरीत पराभव करून आघाडी घेतली होती. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत विनेश फोगटने कोणताही फाऊल न करता विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी विनेश फोगाटचे वजन निर्धारीत वजनापेक्षा १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे विनेशला ( Vinesh Phogat ) कोणतचं पदक मिळालं नाही.

विनेशला रौप्य पदकाची खात्री होती पण..

५० किलो वजनी गट फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने विनेशला रौप्य पदकाची खात्री होतीच, परंतु पदक सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली होती. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर आयओएच्या वैद्यकीय पथकाला, विशेषत: डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमवर निष्काळजीपणाचा आरोप होतो आहे.

Vinesh Phogat appeals against Olympic disqualification with CAS
विनेश फोगटची ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा कोर्टात धाव (एक्सप्रेस फोटो)

पीटी उषा काय म्हणाल्या?

पीटी उषा म्हणाल्या, ‘कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूंच्या वजन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकावर असते. आयओएचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमवर नाही.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘आयओए वैद्यकीय संघ, विशेषत: डॉ. पारडीवाला यांच्यावरील टीका अस्वीकार्य आणि निषेध करण्याजोगी आहे.’ पीटी उषा म्हणाल्या की, त्यांना आशा आहे की लोक ‘कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करतील’.

Story img Loader