Paris Olympic 2024 Vinesh Phogat disqualified: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती ५० किलो वजनी गटात महिलांच्या स्पर्धेत अवघे काही ग्रॅम वजन अतिरिक्त असल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश अपात्र ठरल्याने उपांत्य फेरीत तिने ज्या खेळाडूला नमवलं तिला अंतिम फेरीत खेळण्याची संधी देण्यात आली. मात्र या संधीचं रुपांतर सुवर्णपदकात करण्यात युसेयेन्लिस गुझमन लोपेझला अपयश आलं. अमेरिकेच्या सारा हिल्डरब्रँटने सुवर्णपदकावर नाव कोरलं. साराने विनेशबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

अंतिम मुकाबल्यात साराने लोपेझवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक पक्कं केलं. अमेरिकेसाठी कुस्तीत सुवर्णपदक पटकावणारी ती चौथी महिला कुस्तीपटू ठरली आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

मंगळवारी विनेश फोगटने ५० किलो वजनी गटातून खेळताना तीन लढतीत दिमाखदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. तीनपैकी एका लढतीत विनेशने कारकीर्दीत ८२-० अशी अचंबित आकडेवारी नावावर असणाऱ्या युसाकीला चीतपट केलं. कुस्ती विश्वात युसाकीला हरवणं खळबळनजक मानलं गेलं. दमछाक करणाऱ्या तीन लढतीत सर्वोत्तम प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली होती.

“दबदबा होता, दबदबा आहे आणि…”, विनेश फोगटची निवृत्ती अन् चाहत्यांची हळहळ; पोस्टवर कमेंट्सचा पाऊस!

बुधवारी सकाळी झालेल्या वजनी चाचणीत विनेशचे वजन अतिरिक्त असल्याचं दिसून आलं. मंगळवारी झालेल्या तीन लढतींनंतर विनेशचं वजन २ किलोंनी वाढलं होतं. बुधवारच्या वजन चाचणीपूर्वी विनेशचं वजन ५० किलोपर्यंत आणणं अनिवार्य होतं. यासाठी विविध उपाय रात्रभरात राबवण्यात आले. विनेशचे केस कापण्यात आले. सिंगलेट्स अर्थात तिच्या पोशाखातील इलॅस्टिक कमी करण्यात आलं. ती रात्रभर झोपली नाही. ट्रेडमिलचा वापर केला. सोना बाथ पद्धतीचा उपयोग केला. हे सगळं करूनही विनेशचं वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम अतिरिक्त असल्याचं स्पष्ट झालं. भारतीय पथकाने विनेशसाठी थोडा वेळ मागितला पण दिलेल्या वेळेपेक्षा अतिरिक्त वेळ देण्यास संयोजकांनी नकार दिला. रात्रभरात वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांमुळे विनेशच्या तब्येतीवर परिणाम झाला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिला सलाईन लावण्यात आलं. तिची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.

विनेश अपात्र ठरल्यानंतर अमेरिकेच्या साराला सामन्याविना सुवर्णपदक मिळेल अशी चिन्हं होती. मात्र युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संघटनेने विनेशने उपांत्य फेरीच्या लढतीत जिला हरवलं ती अंतिम मुकाबला खेळेल असं स्पष्ट केलं. सामना होणार नाही असं होतं त्यामुळे मी आनंद साजरा केला. ते खूपच विचित्र होतं. तासाभरानंतर मला ही लढत खेळावी लागणार हे स्पष्ट झालं. मग मी सामन्यासाठी तयारी सुरू केली.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत साराला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. सुवर्णपदकाचा सामना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अर्धा तास उशिराने सुरू झाला. विनेशबाबत विचारलं असता सारा म्हणाली, ‘विनेशसाठी मला वाईट वाटलं. मीही मोठ्या कष्टाने वजन कमी केलं आहे. मंगळवारी तिने सर्वोत्तम खेळ केला. युसाकीला हरवत तिने अद्भुत विजयाची नोंद केली. असं काही होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. ऑलिम्पिक मोहिमेचा शेवट असा होणं दुर्देवी आहे. विनेश एक दर्जेदार प्रतिस्पर्धी आहे. ती लढवय्या कुस्तीपटू आहे. तिचं व्यक्तिमत्वही झुंजार स्वरुपाचं आहे’.

दरम्यान कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने पराभवाचा धक्का दिलेल्या युसाकीने ओक्साना लिवाचचा १०-० असा धुव्वा उडवला.