पटियाला : भारताची आघाडीची कुस्तीगीर विनेश फोगटचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न सोमवारी कायम राहिले. पटियाला येथे पार पडलेल्या निवड चाचणीत विनेशने ५० किलो वजनी गटातून विजेतेपद मिळवून जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी पात्रता सिद्ध केली. संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमाला बगल देत एकाच दिवशी ५० व ५३ किलो वजनी गटातून दिलेली चाचणी, तसेच ५३ किलो गटासाठीही ऑलिम्पिक संधी मिळवण्यासाठी मागितलेली लेखी हमी यामुळे कुस्ती निवड चाचणीच्या दुसऱ्या दिवशी विनेशचीच चर्चा रंगली होती.

हेही वाचा >>> WPL 2024: दीप्ती शर्माची ६० चेंडूत ८८ धावांची झुंज अपयशी ; गुजरात जायंट्स ८ धावांनी विजयी

Vivo V50 is launching in India on February 17
Vivo V50 : 6,000mAh बॅटरीसह लाँच होणार विवोचा स्लिम, ड्रीम स्मार्टफोन; कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल? जाणून घ्या
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Google trends : KTM 390 Adventure S
KTM 390 Adventure S की Royal Enfield Himalayan 450 , कोणती बाइक आहे बेस्ट? डिझाइन, फीचर्स, इंजिन अन् किंमत, जाणून घ्या एका क्लिकवर
Loksatta coverage on Mumbai BMC budget 2025 in marathi
रुपये ७४,४२७,४१,००० फक्त!, मुंबई महापालिकेच्या जवळपास पाऊण लाख कोटींच्या अजस्र अर्थसंकल्पातून होणार काय?
bmc debts for various major projects exceeded rs 2 lakh 32 thousand crores
महापालिकेची देणी मुदतठेवींच्या तिप्पट; २ लाख ३२ हजार कोटींचा खर्च, ३५ हजार कोटींची तरतूद
Mumbai Over 70 percent of 23 8 km Vadape thane highway concreting on mumbai nashik highway is complete
वडपे – ठाणेदरम्यानच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
census delay by Modi government due to low fund provision
जनगणना आणखी लांबणीवर? १२ हजार कोटींची गरज असताना केवळ ५७५ कोटींची तरतूद

विनेशच्या नियोजित ५३ किलो वजनी गटातून यापूर्वीच अंतिम पंघलने ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे. त्यामुळे विनेशने ऑलिम्पिकसाठी ५० किलो वजनी गटातून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑलिम्पिक संघ निवडीसाठी स्वतंत्र चाचणीत संधी मिळण्याची लेखी हमी विनेशने मागितल्यामुळे जवळपास अडीच तासाहून अधिक काळ ५० आणि ५३ किलो या दोन्ही वजनी गटातील निवड चाचणी सुरू होऊ शकली नव्हती. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या एका दिवशी केवळ एकाच वजनी गटातून चाचणी देण्याच्या नियमाला बगल देत विनेशला दोन्ही वजनी गटातून चाचणी देण्याची संधी देण्यात आली. यामध्ये ५० किलो वजनी गटात विनेशने शिवानीचा गुणांवर ११-६ असा पराभव करून विजेतेपद मिळवले आणि जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. मात्र, ५३ किलो वजनी गटात विनेशला अंजूने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर ०-१० असे पराभूत केले. त्यामुळे विनेशची या गटातून ऑलिम्पिक खेळण्याची आशा मावळली. या वजनी गटातून अंतिम निवड चाचणीस सहभागी होण्यासाठी विनेशला पहिल्या चारमध्ये येणे भाग होते. विनेशला या गटात पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

Story img Loader