पीटीआय, बलाली (हरियाणा)

पॅरिस ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतल्यानंतरही झालेल्या स्वागताने विनेश फोगट भारावून गेली आहे. इतके भव्य स्वागत मला अपेक्षित नव्हते. भविष्यात माझ्या बलाली गावातील मुलींना प्रशिक्षण देऊ शकले आणि माझ्यापेक्षा यशस्वी म्हणून घडवले, तर ती माझ्यासाठी अधिक अभिमानाची गोष्ट असेल, असे विनेश म्हणाली.

ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Many youths participated in the Wardha bodybuilding competition
शरीर सौष्ठव स्पर्धेत ‘ यांनी ‘ मारली बाजी, पिळदार शरीराचे दमदार प्रदर्शन.
52 year old shyamala Goli swims 150 km
लाटांवर स्वार होऊन विक्रम करणारी श्यामला गोली

दहा ते बारा तासांचा प्रवास करून गावी पोहचल्यावर विनेशने ताटकळत थांबलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. ‘‘या गावातून माझ्यानंतर एकही मुलगी कुस्तीत चमकली नाही. ही निराशाजनक गोष्ट आहे. आम्ही आव्हान स्वीकारून भावी पिढीसाठी मार्ग मोकळा केला होता. आमच्या यशाने अनेकांना प्रेरणा दिली. त्यामुळे गावातील मुलींना कुस्ती खेळण्यासाठी पाठिंबा द्या,’’ अशी विनंती विनेशने या वेळी केली.

हेही वाचा >>>Surykumar Yadav : कोलकाता बलात्कार प्रकरणावर सूर्याची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मुलींच्या रक्षणाची नव्हे तर मुलांना सज्ञान करण्याची गरज…’

‘‘मी कुस्तीमधून जे काही शिकले, साध्य केले ही ईश्वराची देणगी होती की माझ्या मेहनतीचे फळ हे मी ठरवू शकत नाही. पण, माझ्या गावतील मुलींनी आता पुढे येण्याची गरज आहे,’’ असे सांगून विनेशने कुस्ती प्रशिक्षणाची खेळी सुरू करण्याचे संकेत दिले. ‘‘गावातील मुलींनी फक्त आखाड्यात उतरावे. आजपर्यंतचा माझा अनुभव मी त्यांच्यासाठी पणाला लावायला तयार आहे. या मुलींनी माझ्यापेक्षा अधिक मोठी उंची गाठावी. या मुलीला मी शिकवले असे म्हणण्याची वेळ जेव्हा माझ्यावर येईल, तेव्हा तो चांगला दिवस असेल,’’असेही विनेशने सांगितले.

‘‘भारतीय कुस्ती महासंघाबरोबरचा माझा लढा सुरूच राहील. आम्ही एक वर्षापासून लढत आहोत. ही लढाई सुरूच राहील आणि एकदिवस सत्याचा विजय होईल,’’ असेही विनेश म्हणाली.

हेही वाचा >>>Mayank Yadav : ‘तो टीम इंडियात असेल…’, बीसीसीआयचे सचिव जय शाहांचे मयंक यादवबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, आम्ही त्याच्यावर…

घरातून बहिणींचेच आव्हान

ऑलिम्पिकमधील अपयशानंतर विनेशने समाजमाध्यमावर भावना मोकळ्या करताना बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासात बरोबर असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. मात्र, ज्यांनी घडवले, त्या काका महावीर फोगट यांचाच उल्लेख न केल्याने बहिणी गीता, बबीता आणि रितू यांनी खंत व्यक्त केली. समाजमाध्यमावरून गीता आणि बबीताने नाराजी परखडपणे उघड केली. ‘‘कर्माचे फळ सोपे आहे. फसवणूक केली तर फसवणूकच मिळते, आज नाही, तर उद्या’’ अशी टीका गीताने केली आहे. गीताचा नवरा कुस्तीपटू पवन सरोहानेदेखील समाजमाध्यमावरून विनेशला महावीर फोगट यांची आठवण करून दिली. ‘‘तू खूप छान लिहिले आहे. पण, तू काका महावीर फोगट यांना विसरली आहे. त्यांच्यामुळे तुझ्या कुस्ती कारकीर्दीला सुरुवात झाली. देव तुला शुद्ध बुद्धी देवो,’’ असे सरोहाने लिहिले आहे. ‘‘जर प्रत्येकाला खाली आणणे हा एकमेव उद्देश असेल, तर प्रत्येक यश हा एक पराभव आहे,’’ असे बबीताने म्हटले आहे.

ऑलिम्पिक पदक गमावणे ही माझ्या आयुष्यातील कधीही भरून न येणारी जखम आहे. भविष्यात मी खेळेन की नाही हे माहीत नाही. पण, मायदेशात ज्या पद्धतीने स्वागत झाले ते पाहून मला हिंमत मिळाली आहे. त्याचा आता योग्य दिशेने वापर करायचा आहे. – विनेश फोगट

Story img Loader