Paris Olympics 2024 Vinesh Phogat in Final: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे . ५० किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला. या सामन्यात विनेश फोगटने ५-० असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तिने भारताचे सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित केले आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 11: विनेश फोगटचा उपांत्य सामन्यात एकतर्फी दणदणीत विजय, अंतिम फेरीत मारली धडक

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Loksatta Lokankika Five ekankika  in Mumbai zonal finals Mumbai news
मुंबई विभागीय अंतिम फेरीत पाच एकांकिकांची धडक
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी

उपांत्य सामन्यात विनेश फोगटने पहिला गुण मिळवला होता. पहिल्या फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझला एकही संधी दिली नाही. क्युबाच्या लोपेझने विनेश फोगटच्या पायांवर सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटच्या चांगल्या बचावामुळे तिला गुण मिळवता आला नाही. यानंतर विनेश फोगटने सलग दोन गुण घेत सामन्यात ५-० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरीस युस्नेलिस गुझमन लोपेझने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटने तिला कोणतीही संधी दिली नाही आणि एकतर्फी विजय मिळवला.

हेही वाचा – Paris Olympics 2024: “याच मुलीला तिच्या देशात लाथेने चिरडण्यात…” बजरंग पुनियाची विनेश फोगटच्या विजयावर जळजळीत शब्दात टीका, पोस्ट व्हायरल

विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीत उत्कंठावर्धक लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा ७-५ असा पराभव केला. याशिवाय पहिल्या सामन्यात तिने जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

विनेशने ऑलिम्पिक वगळता प्रत्येक मोठ्या खेळात पदके मिळवली आहेत. यामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण, एक आशियाई स्पर्धेतील विजेतेपद, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यांसह आशियाई चॅम्पियनशिपमधील आठ पदकांचा समावेश आहे. मात्र, तिला रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही. विनेश फोगट, हिने गेल्या वर्षी मॅटपासून बराच काळ दूर होती आणि भारताचे माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग शरण यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन केले.

Story img Loader