Vinesh Phogat getting emotional after entering India went viral : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरली होता. आता भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट शनिवारी सकाळी मायदेशी परतली आहे. दिल्ली विमानतळावरून बाहेर आल्यानंतर तिथे आलेल्या चाहत्यांनी विनेशचे जोरदार स्वागत केले. हे पाहून विनेश फोगटला अश्रू अनावर झाले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाबाबत, विनेशने सामायिक रौप्य पदक देण्यासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडेही अपील केले होते, परंतु १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिची याचिका सीएएसने फेटाळली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन विनेश फोगट जेव्हा मायदेशी परतली तेव्हा तिचे जोरदार स्वागत पाहून ती भावुक झाली.

Happy Dhantrayodashi 2024 wishes in marathi | dhanteras 2024 Wishes
Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; ही घ्या यादी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Ranji Trophy 2024 Drying Pitch By Burning Cow Dung Cakes Desi Jugaad In Match Bihar vs Karnataka
Ranji Trophy : बिहार-कर्नाटक सामन्याची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क ‘देसी जुगाड’, शेणाच्या गवऱ्या जाळतानाचा फोटो व्हायरल
Celebrating Diwali with poor people
गरीबांबरोबर दिवाळी साजरी करा! एका आईच्या चेहऱ्यावर हसू आणणं म्हणजे… VIDEO एकदा पाहाच
Diwali Rangoli Designs
Rangoli Designs : दिवाळीत रांगोळी काढण्यापूर्वी हे Video एकदा पाहाच; एकापेक्षा एक सुंदर रांगोळी डिझाइन्स!
Happy Vasubaras 2024 Wishes in Marathi| Happy Govatsa Dwadashi 2024 wishes in marathi
Vasubaras 2024 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
dhananjay powar family welcome irina at kolhapur
Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण
PM Modi Russia Visit : '
PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

मी येथे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते –

यावेळी विनेश फोगट म्हणाली, ‘मी सर्व देशवासीयांचे आणि येथे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.’ विनेशचे देशात चॅम्पियनप्रमाणे स्वागत झाले आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती.दिल्ली विमानतळाबाहेर विनेश फोगटचे स्वागत करण्यासाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि इतर अनेक कुस्तीपटूही उपस्थित होते. याशिवाय विनेशचे कुटुंबीयही उपस्थित होते.

हेही वाचा – MS Dhoni IPL 2025 : माहीच्या मानधनात तीन पटीने होणार कपात? आयपीएलच्या ‘या’ नियमामुळे कोट्यवधींचा बसणार फटका

विमानतळाबाहेर आल्यानंतर विनेश फोगट भावुक –

विनेश फोगटचा भाऊ हरिंदर पुनिया यांनी एएनआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जे लोक कुस्ती आणि खेळाचे चाहते आहेत, ते आज विनेशचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी आले आहेत. याशिवाय विनेशच्या स्वागताची तयारी घरीही सुरू आहे. ती भलेही ऑलिम्पिक पदक जिंकू शकली नसेल पण तिला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकता यावे यासाठी आम्ही अधिक मेहनत घेण्यासाठी मदत करू.’ विनेश विमानतळाबाहेर आल्यावर चाहत्यांचे असे स्वागत पाहून तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.