Vinesh Phogat NADA Notice: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात अवघ्या १०० ग्रॅम वजनामुळे सुवर्णपदकापूर्वी अपात्र ठरलेली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला आता राष्ट्रीय उत्तेजकविरोधी यंत्रणाने (NADA) नोटीस बजावली आहे. २५ सप्टेंबरला विनेशला NADA कडून नोटीस जारी करण्यात आली आहे. खेळाडू डोप चाचणीसाठी नियोजित वेळी आणि ठिकाणी उपस्थित नसतील तर NADA कडून ही नोटीस बजावली जाते, कारण हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी विनेशला NADA ने १४ दिवसांची मुदतही दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठूनही वजन जास्त असल्याने पदक न मिळाल्याच्या निराशेनंतर विनेशने या खेळातून निवृत्ती जाहीर केली होती. विनेश आणि तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया अलीकडेच काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत आणि आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक जुलाना मतदारसंघातून विनेश लढवणार आहे, सध्या विनेश या प्रचारातच व्यस्त आहे.

हेही वाचा – ‘तिने देशाची माफी मागायला हवी…’, विनेश फोगटबद्दल योगेश्वर दत्तचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहित आहे की…’

NADA ने विनेश फोगटला बजावलेल्या नोटिसच्या अधिकृत माहितीनुसार, विनेशने NADA ला ती नेमकी कुठे आहे, याबद्दल योग्य माहिती दिली नाही. विनेशने ९ सप्टेंबर रोजी सोनीपतच्या खारखोडा गावात तिच्या घरी डोप चाचणीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती दिली होती, परंतु ती नियोजित वेळी तेथे पोहोचली नाही, जे नाडाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते.

NADA ने विनेशला बजावलेल्या नोटीसमध्ये या प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तिला स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली आहे. विनेशच्या डोप चाचणीसाठी नाडाने एका अधिकाऱ्याला डीएव्हीकडे पाठवले होते मात्र ती तेथे उपस्थित नव्हती. NADA ने विनेश फोगटला बजावलेल्या या नोटीसमध्ये तिला एकतर तिची चूक मान्य करावी लागेल किंवा ती डोप चाचणीसाठी ठरलेल्या ठिकाणी सुमारे तासभर थांबल्याचे सिद्ध करावे लागेल.

हेही वाचा – कार्यकाळ संपल्याची नोटीस, धमक्यांची पत्रे, अतिरिक्त खर्च आणि बरेच काही! ‘आयओए’ बैठकीत अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित

आपण डोपिंगविरोधी नियम पाहिल्यास, जर खेळाडू निर्धारित ठिकाणी उपस्थित नसेल तर ते या नियमाचे उल्लंघन मानले जात नाही. पण त्याच खेळाडूने वर्षातून तीन वेळा निर्धारित ठिकाणी आणि वेळेत होणाऱ्या डोपिंग चाचणीसाठी उपलब्ध नसेल तर संस्था त्या खेळाडूवर कारवाई करू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat received notice from nada national anti doping agency after missed dope test amid haryana election campaign bdg