Vinesh Phogat Retirement : आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली आहे. पहिल्याच फेरीत जागतिक विजेत्या आणि ऑलिम्पिकमधील गतविजेत्या जपानच्या युई सुसाकीला हरवून तिने सुवर्णपदकासाठीची दावेदारी भक्कम केली होती. आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत विनेशने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला. मात्र, अखेर तिला रिकाम्या हातीच मायदेशी परतावे लागणार आहे. दरम्यान, तिच्या निवृत्तीच्या घोषणेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकाने तिचं कौतुक करून तिला प्रेरणा देण्याचं काम केलंय.

विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. पहिल्या दिवशी विनेशचे वजन ४९.५ इतके भरले. मात्र, उपांत्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन ५२ किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अधुरी राहिली. त्यामुळे तिने आज पहाटेच निवृत्ती जाहीर केली. परंतु, तिच्या निवृत्तीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, अनेकांनी तिला प्रेरणा दिली आहे.

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
Viral Video Shows Grandchildren Love
‘माझं तिच्यावर खूप प्रेम…’ आजीला झुमके, अंगठी घालणारी नात; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही भावूक व्हाल
Jayashree Thorat and Sujay Vikhe Patil
Sangamner News Update: “माझ्या मुलाच्या सभेत विकृती…”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर सुजय विखेंच्या आई शालिनी विखे संतापल्या
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
What Vinesh Phogat Said?
Vinesh Phogat : साक्षी मलिकच्या आरोपांना विनेश फोगटचं उत्तर, “जर स्वार्थ….”
Rohit Pawar
Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”

हेही वाचा >> Vinesh Phogat : जंतर-मंतर ते पॅरीस ऑलिम्पिक! प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी अपात्र ठरली, पण…!

निराशा ना हो आप बहादूर है विनेश| कुश्ती नहीं आपने जग जीता है| आपके संघर्ष की कहाणी दुनिया अपने बच्चो को सुनाया करेगी|” अशी काव्यात्मक रचना एका नेटिझनने केली आहे. तर एकाने जेव्हा कुस्तीने हरवू शकले नाहीत तेव्हा षडयंत्र रचून हरवलं, अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

“अहंकारी लोकांचा अहंकार तोडला आहेस तू, आजच्या जगात कोणीतरी आहे जिच्यात पाठीचा कणा आहे”, असं म्हणत तिच्या चिकाटी वृत्तीचं कौतुक केलं आहे.

“गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले

हम सबको आप पर गर्व है

आपका प्रयास ही किसी मेडल से कम नहीं है!”

असंही नेटिझन्स म्हणत आहेत. तर, तर दबदबा था, दबदबा है आणि दबदबा यापुढेही कायम राहील, असं एकाने म्हटलं आहे.

“तुम्ही हे दोन्ही फोटो पाहा. बहीण विनेश तेव्हाही हरली नव्हती आणि आजही हरली नाही. संपूर्ण देश विनेशच्या सोबत उभा आहे”, असंही एकाने म्हटलं आहे.

दरम्यान, विनेश सर्वप्रथम २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातून सहभागी झाली होती. तिची आगेकूच सुरू असतानाच गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. रिओमध्ये अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनेश टोक्योत वजन वाढवून ५३ किलो गटातून सहभागी झाली. त्यावेळी ती जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होती. मात्र, निराशाजनक कामगिरीमुळे तिला नवव्या स्थानावर राहावे लागले. हा सहभाग तिच्यासाठी वादग्रस्त ठरला. बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत भारतीय कुस्ती संघटनेने तिच्यावर बंदीही आणली. आपण काहीशा मानसिक तणावाखाली होतो असे तिने सांगितले.