नव्या संसद भवनाचं रविवारी ( २८ मे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झालं. दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर धडकू पाहणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला. यासह जंतर-मंतर मैदानावरील कुस्तीपटूंचे तंबूही पोलिसांनी हटवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीकरत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं.

हेही वाचा : जंतर-मंतरवर ‘दंगल’, नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या कुस्तीगीरांना पोलिसांनी रोखलं, दिल्लीत सुरक्षा वाढवली!

त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याच समोर आलं आहे.

कुस्तीपटू साक्षी मलिकने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पोलीस बळाचा वापर संगीता फोगाट आणि विनेश फोगाट हिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या हातात भारतीय ध्वज तिंरगाही दिसत आहे. ट्विटवर साक्षी मलिकने लिहलं की, “आपल्या खेळाडूंना अशी वागणूक दिली जात असून, जग सगळं पाहत आहे.”

हेही वाचा : नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याभिषेक…”

बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे,” असं सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat sakshi malik bajrang punia sangeeta phogat detained ahead march to parliament ssa