नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघावरील (डब्ल्यूएफआय) हंगामी समिती बरखास्त करण्याच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निर्णयाचा निषेध करत भारतीय कुस्तीविरोधात दंड थोपटलेल्या विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी मंगळवारी ब्रिजभूषणसारख्या दडपशाहीचा वापर करणाऱ्या लोकांना भारतीय क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवा असे पंतप्रधानांना साकडे घातले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनेश आणि साक्षी यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा समाजमाध्यमाचा उपयोग करून घेतला. महिलांच्या ताकदीचा वापर करून मुद्दा कसा फिरवायचा हे पंतप्रधानांना चांगले माहीत आहे. अशी टिप्पणी करत विनेश व साक्षीने पंतप्रधान मोदी यांना महिला शक्तीचे खरे सत्य जाणून घेण्याची विनंती केली, असे विनेशने समाजमाध्यमावर लिहिले आहे.

हेही वाचा >>>अचूक निर्णयासाठी ‘आयपीएल’मध्ये नवी प्रणाली; जलद निर्णयांसाठी होणार फायदा;  प्रणालीवर काम करण्यासाठी १५ पंचांची निवड

विनेश ५० किलो वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असली, तरी एकाच दिवशी दोन वजन गटांतून चाचणी दिल्यामुळे तिच्या सहभागाविषयी अजून संभ्रमच मानला जात आहे. यानंतरही विनेश पंतप्रधान मोदी महिलांचा नुसता ढाल म्हणून उपयोग करणार नाहीत याबाबत आशा व्यक्त केली. लैंगिक छळवणुकीचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण यांच्या समर्थकांचेच भारतीय कुस्ती महासंघावर वर्चस्व राहिले आहे. हंगामी समिती बरखास्त झाल्यामुळे आता पुन्हा त्याच व्यक्ती कुस्तीचा ताबा घेणार आहेत. अशा अत्याचारी संघटना आणि संघटकांविरुद्ध काही तरी ठोस पावले उचलावीत, अशी ही विनंती विनेशने पुढे केली आहे.

साक्षीने तर देशात श्रीमंत इतका शक्तिशाली आहे की तो सरकार, राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेच्या वरचढ वाटतो, असे वक्तव्य केले आहे. भारतीय कुस्ती महासंघावरील हंगामी समिती बरखास्त केल्यामुळे भारतात महिला कुस्तीगिरांचा अपमान करण्याची परंपरा कायम राहण्याची भीतीदेखील साक्षीने व्यक्त केली आहे.