Vinesh Phogat Shared Video of Wrestling: विनेश फोगट ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिला महिला खेळाडू ठरण्याचा विक्रम १०० ग्रॅमने हुकला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती पण अंतिम फेरीपूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि आता ती आमदार झाली आहे. पण आता विनेशने शेअर केलेल्या या पोस्टनंतर ती पुन्हा एकदा कुस्तीत पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी ती काँग्रेसशी पक्षात सामील झाली आणि जुलानामधून मोठ्या फरकाने विजयी झाली. आता ती जुलाना येथील आमदार आहे. पण आता या सर्व गोष्टींच्या दरम्यान तिने कुस्तीचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या पोस्टमधून तिने जणू काही ती कुस्तीच्या मॅटवर पुनरागमन करणार असल्याचे संकेत देत आहे, अशी चर्चा सुरू आहे.
विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकची जर्सी घालून आमदार म्हणून शपथ घेतली. स्पोर्ट्स किटमध्ये शपथ घेण्याच्या प्रश्नावर विनेश फोगटने असेही म्हणाली होती की मी एक खेळाडू आहे आणि मला खेळाडूच राहायचे आहे. आता विनेश फोगटने पुन्हा कुस्तीत पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. विनेशने आज २९ ऑक्टोबरला दुपारी तिच्या कुस्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा आहे.
विनेश फोगट व्हिडिओमध्ये कॅनेडियन कुस्तीपटूला पराभूत करताना दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विनेश फोगटने वसीम बरेलवी यांचा एक शेअर लिहिला आहे. विनेश फोगटसाठी पॅरिस ऑलिम्पिक हे एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. ऑलिम्पिकमधील धक्क्यानंतर भारतात परतण्यापूर्वीच तिने निवृत्तीची घोषणा केली.
विनेश फोगटच्या व्हीडिओचे कॅप्शन
“उड़ान वालों उड़ानों पे वक्त भारी है
परों की अब के नहीं हौसलों की बारी है,
मैं कतरा हो के तूफानों से जंग लड़ता हूं
मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है,
कोई बताये ये उसके गुरूरएबेज़ा को
वो जंग हमने लड़ी ही नहीं जो हारी है,
दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत
ये एक चिराग कई आंधियों पे भारी है।।”