समीर जावळे

Vinesh Phogat विनेश फोगट ही आपल्या देशाची महिला रेसलर. महावीर फोगट यांचा वारसा तिच्याकडेही आला. महावीर फोगट हे तिचे काका. मात्र त्यांनीही तिला रेसलर, पैलवान म्हणूनच वाढवलं. भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकमधल्या आशा पल्लवित झाल्या होत्या कारण विनेशने कुस्तीच्या अंतिम सामन्यात धडक मारली. मात्र १५० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशचं (Vinesh Phogat) स्वप्न भंगलं. विनेशने त्यानंतर कुस्तीला आई म्हणत तिला सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यानंतर सगळं जग तिच्यासाठी हळहळलं. पण विनेशची कारकीर्द पाहिली तर यशाने तिला दिलेली ही तिसरी हुलकावणी आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Video Viral
रिलच्या नादात महिलेच्या पदराला लागली आग, जळता पदर घेऊन धावत सुटली, Video Viral
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Jalaj Saxena Becomes 1st Player With 6000 Runs and 400 Wickets in History of Ranji Trophy
Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं

२०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये काय घडलं?

विनेशने ( Vinesh Phogat ) इस्तंबूलमध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्वालिफाइंग इव्हेंटमध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि २०१६ च्या रियो ऑलिम्पिकचं तिकिट नक्की केलं. २०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करत विनेश क्वार्टर फायनलपर्यंत पोहचली. मात्र त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं की २१ वर्षीय विनेशचं पदकाचं स्वप्न अपूर्ण राहिल. चीनच्या सुन यनानचा सामना करताना विनेशचा उजवा गुडघा डिसलोकेट झाला आणि पदक मिळवण्याचं स्वप्न एका क्षणात मोडलं. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमधली ती रात्र तिने मॅटवर रडून काढली. मोक्याच्या क्षणी गुडघ्याला झालेल्या दुखण्याने तिचं पदक तिच्यापासून हिरावून नेलं. मात्र मी खचणार नाही म्हणत विनेश पुन्हा उभी राहिली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये काय घडलं?

२०१८ मध्ये भारतात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये विनेशने पुन्हा उत्तम कामगिरी केली. सुवर्ण पदक जिंकलं आणि आपण सामना करायला घाबरत नाही हेच दाखवून दिलं. तसंच आशियाई कुस्ती चँपियनशिपमध्ये तिने कांस्य पदक मिळवलं. २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी ती पात्र ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये विनेशने ( Vinesh Phogat ) सोफिया मॅटसनवर विजय मिळवला. मात्र बेलारुसच्या वेनेसाने तिला हरवलं आणि पुन्हा एकदा तिचं पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर २०२२ मध्ये मॅट कुस्ती प्रकारात तिने बेलग्रेड या ठिकाणी वर्ल्ड कुस्ती चँपियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकलं. तसंच बर्मिंघम येथे झालेल्या स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकलं. यानंतर तिला अपेक्षा होती की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण नक्की जिंकू. पण तिचं ते स्वप्नही भंगलं.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन कमी करण्यासाठी विनेशने केले प्रयत्न

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात उतरुन स्पर्धेला सामोरं जाण्याआधी वजन कमी करण्यासाठी विनेशने ( Vinesh Phogat ) खूप मेहनत केली. केस कापले, सायकलिंग केलं, रक्तही काढलं पण शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं. तिचं वजन ५० किलो १५० ग्रॅम भरलं आणि तिला अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न भंगताना तिने स्वतः पाहिलं. यानंतर विनेशचा ( Vinesh Phogat ) चेहरा खरोखरच बघवत नव्हता. हताश चेहऱ्यावर स्मित ठेवण्याचा प्रयत्न तिने नंतर केला खरा. पण ती किती रडली, तिला पदक न मिळाल्याचं किती वाईट वाटलं हे तिचा तो चेहरा पाहूनच सगळ्या जगाला कळलं. यानंतर विनेशने कुस्ती माँ असं कुस्तीचं वर्णन करत कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला.

फायनलमध्ये धडक, पण नियतीच्या मनात वेगळंच

विनेशने ६ ऑगस्टला सारा हिल्डेब्रांटला हरवलं. सारा आणि विनेश यांच्यातली लढतही रंगतदार झाली होती. एकही सामना न हरलेल्या साराचं आव्हान विनेशसमोर होतं. सारा हिल्डेब्रांट विरोधात उत्तम खेळाचं दर्शन घडवत विनेशने कुस्तीची अंतिम फेरी गाठली मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. हे तेव्हा तिला माहीत नव्हतं.

हे पण वाचा- Vinesh Phogat : विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा! पोस्ट करत म्हणाली, “मी हरले आणि…”

विनेशला संघर्ष कधी चुकलाच नाही

खरंतर संघर्ष मग तो मॅटवरचा असो, मैदानावरचा असो किंवा बाहेर द्यावा लागलेला तो विनेशला ( Vinesh Phogat ) चुकला नव्हताच. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनाही ती अशीच थेट भिडली होती. जंतरमंतरवर जेव्हा आंदोलन करण्यात आलं त्यावेळी आंदोलकाना चिरडण्यातही आलं, खेचण्यात आलं त्यांची फरपट झाली. ही फरपटही विनेशने सहन केली. पण ती यंत्रणेच्या विरोधात ठाम उभी राहिली.

Vinesh Phogat News
विनेश फोगटने वजन कमी होण्यासाठी काय काय केलं? (फोटो सौजन्य-FE)

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लढा

मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिला मल्लांनी लैंगिक छळाचा आरोप केला. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरोधात दंड थोपटण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा विनेश फोगट ( Vinesh Phogat ) , साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या खेळाडू त्या मुलींच्या बाजूने खरोखरच्या मैदानात उतरले. त्यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना तगडी टक्कर दिली यात काही शंकाच नाही. विनेश फोगट ( Vinesh Phogat ) ही महिला पैलवान आहे जिने तिच्यातली हिंमत हरलेली नाही. तिने यंत्रणेविरोधात उभं राहतानाही आपलं काय होईल याची पर्वा केली नाही. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात तिच्या डोळ्यात यंत्रणेविरोधातला राग हा स्पष्ट दिसत होता.

विनेशचं स्वप्न पुन्हा अधुरं आणि तिच्या मनातील अश्वत्थाम्याची जखम

गीता फोगट आणि बबिता यांना पाहात त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत विनेशने एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न होतं भारतासाठी ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदक जिंकायचं. पण नियतीने असे काही फासे टाकले की तिची संधी तीनदा हुकली. नियतीने केलेला तिसरा वार मात्र तिच्या प्रचंड जिव्हारी लागला. आदल्या दिवशी अंतिम फेरीत पोहचल्याचा आनंद आणि सुवर्ण पदक जिंकणारच हे वाटत असतानाच वजनांमधल्या काही ग्रॅम्सनी दगा दिला. त्यामुळे विनेशने थेट कुस्तीलाच अलविदा केलाय. महाभारतात अश्वत्थामा हा त्याने केलेल्या पापामुळे अमरत्वाचं वरदान आणि डोक्यावर जखम घेऊन तेल मागणारा चिरंजीव ठरला. तो आहे की नाही? हे ठाऊक नाही पण अश्वत्थामा म्हटलं की त्याच्या डोक्यावर झालेली ती जखम आणि त्याला तेल न मिळाल्याने झालेली ठसठस हे आपण अगदीच समजू शकतो. आज पदक कमवण्याची संधी हुकल्यानंतर, नियतीने अशी हिरावून घेतल्यानंतर विनेशच्या मनातही त्याच अश्वत्थाम्याप्रमाणे एक जखम आहे जी कधीही भरुन येणार नाही. पण विनेश तू लढलं पाहिजेस कारण देश आजही तुझ्या बरोबर आहे.