Haryana Government Decided To Honour Vinesh Phogat: विनेश फोगाटने गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळ प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे तिला अंतिम सामन्याला मुकावे लागले होते. पण आता, ऑलिंपिक रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना ज्या प्रकारे सन्मान आणि लाभ दिले जातात, त्याचप्रकारेचचे सन्मान आणि लाभ विनेश फोगाटला दिले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय हरियाणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस आमदार विनेश फोगाटला हरियाणा सरकारने त्यांच्या क्रीडा धोरणांतर्गत राज्य लाभांबाबत तीन पर्याय दिले आहेत. या पर्यायांमध्ये ४ कोटी रुपयांचे रोख बक्षीस, हरियाणा शहरी विकास प्राधिकरण अंतर्गत भूखंड किंवा ‘ग्रुप अ’ नोकरी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनेश काँग्रेसकडून आमदार झाली आहे. त्यामुळे तीला सरकारी नोकरी सोडून इतर दोन्हींपैक एक पर्याय स्वीकारावा लागणार आहे. दरम्यान सरकाच्या या प्रस्तावाल विनेश फोगाटने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
रौप्यपदक विजेत्याला मिळणारे सर्व लाभ आणि सन्मान
विनेश फोगाट पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती पण तिला अपात्र ठरवण्यात आले होते. नायब सैनी यांनी तेव्हा घोषणा केली होती की, ते विनेशला देशाच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला मिळणारे सर्व लाभ आणि सन्मान देतील. काही दिवसांपूर्वी विनेश फोगटने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता की, पॅरिस ऑलिंपिकला आठ महिने उलटूनही तिला बक्षीस रक्कम मिळालेली नाही.
विनेश फोगाट काय म्हणाले?
“मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, विनेश आमची मुलगी आहे आणि तिला ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्याप्रमाने लाभ आणि सन्मान मिळेल. पण त्यांचे हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही,” असे विनेश विधानसभेत म्हणाली होती.
ती पुढे म्हणाली होती की, “हा पैशांचा विषय नाही, तर सन्मानाचा विषय आहे. राज्यभरातील अनेक लोक मला सांगतात की, मला रोख रकमेच्या स्वरूपात पुरस्कार मिळायला हवा असावा.”
मुख्यमंत्र्यांचे ट्विट
पॅरिस ऑलिंपिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर, त्यावेळी मुख्यमंत्री सैनी यांनी ट्विट केले होते की, ते हरियाणाचा अभिमान असलेल्या विनेश फोगाट हिचा ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूप्रमाणे सन्मान करतील.