Mahavir Phogat says Vinesh Phogat should have joined BJP : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी ३२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये कुस्तीपटू विनेश फोगटला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विनेशने शुक्रवारीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, विनेश फोगटचे काका आणि प्रशिक्षक महावीर फोगट याचा विरोध करत आहेत. महावीर फोगट यांनी विनेश फोगटच्या राजकारणात येण्याच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रिब्यूनशी बोलताना दंगल फेम कुस्तीपटू गीता आणि बबिताचे वडील महावीर फोगट यांनी सांगितले की, त्यांनी विनेशला कुस्तीमध्ये तिची कारकीर्द सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. महावीर फोगट म्हणाले, “मी तिला कुस्ती सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्याचबरोर चार वर्षांनंतर पुन्हा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले होते. त्यामुळे राजकारणात येण्याचा निर्णय तिचा स्वतःचा आहे.” विनेशमध्ये अजूनही कुस्ती खेळण्याची क्षमता असून तिने या खेळात सातत्य ठेवावे, असे ते म्हणाले.

विनेशने काँग्रेसऐवजी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता –

महावीर फोगट म्हणाले की, “कारकिर्दीच्या या टप्प्यावर तिने राजकारणात यावे असे मला वाटत नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी विनेशने आपला सल्ला घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.” महावीर फोगट पुढे म्हणाले की, ते राजकारणात नाहीत आणि विनेशचा प्रचारही करणार नाहीत. ते काँग्रेसच्या विरोधात असल्याचेही म्हणाले. महावीर फोगट पुझे म्हणाले की, जर विनेशला राजकारणातच रस होता, तर तिने काँग्रेसऐवजी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता. विशेष, म्हणजे महावीर फोगट यांची धाकटी मुलगी बबिता फोगट ही आधीच भाजपची सदस्य आहे. दादरी विधानसभा मतदारसंघातून तिने मागची विधानसभा निवडणूकही लढवली होती, पण तिचा पराभव झाला होता.

हेही वाचा – Moeen Ali Retirement : इंग्लंडला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या स्टार अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबरला मतदान –

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनात विनेश आणि बजरंग आघाडीवर होते. या दोन्ही कुस्तीपटूंनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपली राजकीय खेळी सुरू केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही तासांनी बजरंग पुनियाची पक्षाने अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मात्र, हरियाणातील विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat uncle mahaveer said if she wanted to enter politics she should have joined bjp instead of congress vbm