Vinesh Phogat Disqualified uncle Mahavir breaks down : विनेश फोगट आज ७ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपात्र ठरली आहे. यासह भारताचे एक पदक हुकले आहे. जेव्हा विनेशला अपात्र ठरवण्यात आले, तेव्हा तिचे काका महावीर फोगट यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता एकही पदक येणार नाही, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, फेडरेशनकडे माझी कोणतीही मागणी नाही. त्यांना वाटेल ते करतील. यावेळी संपूर्ण देश दु:खात आहे. या अपात्रतेमागे काही षडयंत्र असू शकते, असे महावीर फोगट म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महावीर फोगट पुढे म्हणाले, मी अजून तिच्याशी बोललो नाही. याचे कारण काय होते, ते विनेशशी बोलल्यानंतरच कळू शकेल. तिथे माझा भाचा आहे, त्याचा फोन आला होता. त्यावेळी संगीताही रडत होती. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित केल्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. आज तिचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आढळले. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले.

विनेश फोगटचे काका महावीर फोगट भावुक –

महावीर फोगट काय म्हणाले?

महावीर फोगट एनआयला म्हणाले, ‘मी या निर्णयाबद्दल काय बोलू? बोलण्यासारखे काही राहिले नाही. तिच्याकडून आम्हाला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. यात सरकार काही करू शकत नाही, सर्व काही फेडरेशनवर अवलंबून आहे. मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही, आता विनेशशी बोलल्यावरच मला सर्व कळेल. त्यामुळे आता मला काही बोलायचे नाही. संपूर्ण देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. नियम आहेत. परंतु जर कुस्तीपटूचे वजन ५०-१०० ग्रॅम जास्त असेल, तर त्याला खेळण्याची परवानगी दिली जाते. मी देशातील जनतेला सांगेन की निराश होऊ नका, एक दिवस ती नक्कीच पदक घेऊन येईल. मी तिला पुढील ऑलिम्पिकसाठी तयार करेन.’

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) ने सांगितले की भारतीय संघाच्या महिला कुस्ती ५० किलो गटातून विनेश फोगटला अपात्र ठरविल्याची माहिती मिळाली हे खेदजनक आहे. संघाने केलेले सर्वोत्तम प्रयत्न असूनही, आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त होते. यावेळी संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो.

हेही वाचा – Vinesh Phogat : “…तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा”, विरोधकांची मागणी; पंतप्रधान काय म्हणाले?

महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी विनेश फोगटचे वजन थोडे जास्त असल्याचे आढळून आले. मंगळवारी रात्री विनेशन या स्पर्धेत सुवर्णपदकाटी फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की आज सकाळी तिटे वजन जास्त असल्याचे आढळले. त्यामुळे स्पर्धेचे नियम तिला पुढील फेरी खेळण्याची परवानगी देत ​​नाहीत आणि तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. यूडब्ल्यूडब्ल्यच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू वजन मोजण्यासाठी उपस्थित राहिला नाही किंवा नियमानुसार वजन भरले नाही, तर त्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर केले जाते. त्याचबरोबर रँकशिवाय शेवटचे स्थान दिले जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinesh phogat uncle mahavir breaks down after her disqualification in wrestling at vbm