पीटीआय, नवी दिल्ली

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळालेल्या विनेश फोगटने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चीनच्या हांगझो येथे होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा तिने मंगळवारी केली. यामुळे राखीव खेळाडू अंतिम पंघालचा संघ समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

विनेश व बजंरग पुनिया यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत सूट दिल्याने वाद निर्माण झाला होता. भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने हा निर्णय घेतला होता. जकार्ता येथे २०१८ रोजी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या विनेशने ‘ट्विटर’च्या माध्यमातून आपल्या दुखापतीबाबत माहिती दिली.

१३ ऑगस्टला विनेशच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि १७ ऑगस्टला मुंबईत तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही ती सहभागी होऊ शकणार नाही. या स्पर्धेला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची निवड चाचणी २५ आणि २६ ऑगस्टला पतियाळात होणार आहे.पंघाल व सुजीत कलकल यांनी विनेश व बजरंग यांना थेट प्रवेश दिल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते, पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.

पंघालने निवड चाचणीत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात, तर विशाल कालीरमणने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात विजय नोंदवले होते. या दोन्ही मल्लांना राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले. हरियाणाच्या सिसाई गावात आयोजित खाप पंचायतही पंघाल व कालीरमण यांना संघात सहभागी करून घेण्याच्या पक्षात होती. ‘‘संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या दुखापतीबाबत सूचित केले आहे, जेणेकरून राखीव खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकतील,’’ असे विनेश म्हणाली.

दोन दिवसांपूर्वी १३ ऑगस्टला सरावादरम्यान माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीची चाचणी केल्यानंतर चिकित्सकांनी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मुंबईत गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडेल. मी गेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे माझे स्वप्न होते. मात्र, आता मला सहभाग नोंदवता येणार नाही. – विनेश फोगट

Story img Loader