विनिता चोपडे (टाटा मोटर्स) हिने आंतर औद्योगिक बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे महिला एकेरी गटात विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा औद्योगिक क्रीडा संघटनेने आयोजित केली होती.
महिलांच्या एकेरीत विनिताने सायली क्षीरसागर हिला २१-८, २१-७ असे पराभूत केले. दुहेरीत कीर्तिमालिनी पंडित व स्वाती सुचिव यांनी अजिंक्यपद मिळविले. त्यांनी अंतिम लढतीत विनिता चोपडे व नीलम सैनानी यांचा २१-१३, २१-११ असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर यांच्या हस्ते झाले. थिसेन क्रुप इंडस्ट्रीजचे उपव्यवस्थापक रणजित मोहिते हे यावेळी उपस्थित होते. सदाशिव गोडसे यांनी स्वागत केले तर कौस्तुभ नाडगोंडे यांनी आभार मानले.

Story img Loader