Vinod Kambli Video Viral : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली आहे. २००० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या या खेळाडूला मद्यप्राशन करण्याचं व्यसन जडलं आणि त्यात त्याने सर्वकाही गमावलं. विनोद कांबळीला आता धड चालताही येत नसल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एकेकाळी कोट्यवधी रुपयांचा मालक असणारा विनोद कांबळी आता दिवाळखोर झाला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्याची परिस्थिती इतकी दयनीय झालीय की त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाहीये.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की विनोद कांबळी स्वतःच्या पायावर उभाही राहू शकत नाहीये. उभा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनोदने एका दुचाकीचा आधार घेतला. तरीदेखील त्याचा तोल जात होता. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला आधार दिला व उचलून बाजूला नेलं. विनोद कांबळीचा असाच एक व्हिडीओ यापूर्वी देखील व्हायरल झाला होता. यामध्ये विनोद हात जोडून विनंती करत होता की माझ्याकडे काम नाही, त्यामुळे घर चालवणं देखील कठीण झालं आहे.

Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Lakshmi Niwas Marathi Serial Jahnavi take ukhana for Jayant
Video: “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी…”, ‘लक्ष्मी निवास’मधील जान्हवीने जयंतसाठी घेतला जबरदस्त उखाणा
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Gashmeer Mahajani on Chhaava Controversy
Video: एकाच चित्रपटात दुहेरी ऐतिहासिक भूमिका करणारा गश्मीर महाजनी ‘छावा’च्या वादाबद्दल म्हणाला, “माझा अनुभव…”
Video : वरुण धवनने प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ; ‘बॉर्डर २’ सिनेमाबद्दल दिली माहिती, म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

हे ही वाचा >> Vinesh Phogat: विनेश फोगट उपांत्य फेरीत, अवघ्या पाऊण तासात दोन बड्या कुस्तीपटूंना दिला धोबीपछाड, पाहा VIDEO

सचिनला मदतीचं आवाहन

विनोद कांबळीची ही अवस्था पाहून काही नेटीझन्सनी त्याचा बालपणीचा मित्र आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला या व्हिडीओवर टॅग करून कांबळीची मदत करण्याचं आवाहन केलं आहे. व्हिडीओ शेअर करत एका युजरने म्हटलं आहे, “विनोद कांबळीची ही अवस्था पाहून मन हेलावून गेलं. तो एक जबरदस्त खेळाडू होता. त्यानेही त्याचा मित्र सचिन तेंडुलकरसारखं आयुष्य जगायला हवं होतं. तो खूप मोठा झाला असता, मात्र आता त्याची अवस्था वाईट आहे. तो पूर्णपणे बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो.”

हे ही वाचा >> Priyanka Goswami: ऑलिम्पिकला जाऊन रिल बनविणारी प्रियांका गोस्वामी ट्रोल; ४५ खेळाडूंमध्ये आला ४१ वा क्रमांक

एका युजरने कमेंट केली आहे की “दारूमुळे विनोद कांबळीची अशी अवस्था झाली आहे. दारूनेच त्याला देशोधडीला लावलं. सचिन तेंडुलकरजी तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या.” दुसऱ्या एका युजरने सचिनला विनंती केली आहे की “तुझा मित्र खूप आजारी आहे. जुन्या सर्व गोष्टी विसरून त्याची मदत कर.”
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा आहे याची अधिकृत माहिती नाही.

Story img Loader