Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा मित्र विनोद कांबळी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अगदी १० वर्षांचे असल्यापासून हे दोघेही एकत्र क्रिकेट खेळत मोठे झाले आणि या दोघांचा प्रवास भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचला. दोघेही भारताकडून एकत्र क्रिकेट खेळतानाही दिसले. क्रिकेट विश्वातले द्रोणाचार्य अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर सर यांचे हे दोघेही शिष्य. आचरेकर सरांच्या जयंती निमित्त शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांचं स्मारक उभं करण्यात आलं. त्या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीही उपस्थित होते. यादरम्यानचा विनोद कांबळी आणि सचिन यांचा एक व्हीडिओही व्हायरल झाला होता. या व्हीडिओनंतर विनोद कांबळी आणि सचिनची मैत्री चर्चेचा विषय आहेत. विनोद कांबळी यांनी नुकत्याच एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली, ज्यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

आपल्या बेधडक आणि विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे विनोद कांबळी गेल्या काही काळापासून आजारी आहेत. व्यसनांच्या अधीन गेल्याने त्यामुळे होणाऱ्या शारिरीक व्याधींना ते सामोरे जात आहेत. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या कार्यक्रमात विनोद कांबळी यांना जागेवर उभेही राहता येत नव्हते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती आणि सचिन तेंडुलकरने त्यांना मदत करावी अशी मागणी चाहते करत आहेत. दरम्यान विनोद कांबळी यांनी विकी ललवानी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सचिन आणि त्यांच्या मैत्रीबद्दल त्यांच्यातील वादाबाबत वक्तव्य केले आहे. सचिनने त्यांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केल्याचेही सांगितले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

या मुलाखतीत विनोद कांबळींनी सुरूवातीला त्यांची सध्या प्रकृती कशी आहे याबाबत विचारले असता ते आता ठिक असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांची पत्नी त्यांची खूप काळजी घेते आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. अजय जडेजा विनोद कांबळींना घरी भेटण्यासाठी आले होते हेही सांगितले. एका महिन्यापूर्वी विनोद कांबळी घरातच चक्कर येऊन पडले होते आणि त्यादरम्यान ते ३ वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. यापूर्वी २०१३ मध्ये विनोद कांबळींना ह्रदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा त्यांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी लिलावाती रूग्णालयात असताना सचिननेच त्यांना मदत केली होती.

हेही वाचा – IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?

विनोद कांबळी ह्रदयविकाराचा झटका आला त्या घटनेबद्दल सांगताना म्हणाले, “मला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं होतं. मी कार चालवता चालवता पडलो आणि माझ्या पत्नीने मला थेट लिलावतीमध्ये दाखल केलं आणि तेव्हा दोन हार्ट अटॅक आले होते. एकावेळी दोन हार्ट अटॅक कोणाला येतात. माझी पत्नी तेव्हा माझ्याबरोबर होती, ते सर्व पाहून रडत होती.”

हेही वाचा – भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ

“सचिनने माझ्यासाठी सर्वकाही केलंय” – विनोद कांबळीचं सचिन तेंडुलकरवर वक्तव्य

२००९ मध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यात वाद झाला होता. विनोद कांबळी म्हणाले होते की सचिनने माझ्या कठीण काळात मला मदत केली नव्हती. पण नंतर विनोद कांबळींच्या समोर त्यांच्या बालपणीचे दिवस येत होते आणि मग त्यांनी पुढाकार घेत सचिनशी संवाद साधला आणि ही मैत्री पुन्हा सुरू झाली. पण विनोद कांबळींनी २००९ मध्ये सचिनवर असे आरोप केले होते हे विचारताच त्यांनी सांगितलं की, ” तेव्हा ते असं माझ्या डोक्यात आलं होतं, तेव्हा मी सर्वच गोष्टींमुळे निराश होतो, भावनेच्या भरात बोलून गेलो पण असं खरंतर काही नव्हतं. त्याने सर्वकाही केलं माझ्यासाठी. त्याने मला खूप मदत केली आहे. २०१३ मध्ये माझ्यावर ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर २ शस्त्रक्रिया झाल्या तेव्हाही त्याने मला आर्थिक मदत केली.”

Story img Loader