Vinod Kambli on Family: दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे एकेकाळचे शिष्य असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी उपस्थित होते. यावेळी मंचावर बसलेल्या विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये विनोद कांबळीला उठता येत नव्हते, व्यवस्थित बोलता येत नव्हते, असे दिसले. या व्हिडीओनंतर विनोद कांबळीबाबत पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र आता विकी ललवानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत विनोद कांबळीने आपले आजारपण, कौटुंबिक आणि सध्याची आर्थिक परिस्थिती याबाबत भाष्य केले आहे. तसेच आपला मुलगाही क्रिकेट खेळत असल्याची माहिती दिली.

या मुलाखतीमध्ये कुटुंबाबाबत बोलत असताना विनोद कांबळी म्हणाले, मला १४ वर्षांचा एक मुलगा आणि १० वर्षांची एक मुलगी आहे. मुलगा जिजस क्रिस्टियानो कांबळीही क्रिकेट खेळतो. तोही माझ्यासारखाच डावखुरा फलंदाज असून बिनधास्त फटकेबाजी करतो. पहिल्या चेंडूपासून तो फटकेबाजी करत असून तो माझ्यासारखाच खेळतो. तोही कधीतरी भारतीय संघात येईल, असे मला वाटते.

PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान
Gautam Gambhir abused my family Manoj Tiwary allegations on Gautam Gambhir
Manoj Tiwary : ‘त्याने माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली अन्…’, मनोज तिवारीने पुन्हा एकदा साधला गौतम गंभीरला केलं लक्ष्य
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”

हे वाचा >> VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

गाडी चालविताना हृदयविकाराचा झटका आला आणि..

विनोद कांबळी ह्रदयविकाराचा झटका आला त्या घटनेबद्दल सांगताना म्हणाले, “मला अचानक अस्वस्थ वाटायला लागले होते. मी कार चालवता चालवताना पडलो आणि माझ्या पत्नीने मला थेट लिलावतीमध्ये दाखल केले आणि तेव्हा दोन हृदयविकाराचे झटके आले होते. एकावेळी दोन हृदयविकाराचे झटके कोणाला येतात. माझी पत्नी तेव्हा माझ्याबरोबर होती, ते सर्व पाहून रडत होती.”

विनोद कांबळी यांनी यांच्या कुटुंबियांचा जुना व्हिडीओ

आर्थिक परिस्थिती बिकट आहे

विनोद कांबळी यांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “माझी आर्थिक परिस्थिती सध्या हलाखीची आहे. पण माझे कुटुंब खंबीरपणे माझ्या पाठिशी उभे आहे. माझी पत्नी अँड्रियाने सर्व व्यवस्थित हाताळले असून मी तिला सलाम करतो.” तसेच सुनील गावस्कर, कपिल देव यांनी मला मदतीचे आवाहन केले आहे. कपिल देव यांनी मला पुनर्वसन केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे, तेही मी स्वीकारले असल्याचे ते म्हणाले.

वानखेडेवरील खेळी स्मरणात राहिली

विनोद कांबळी यांनी दोनवेला द्विशतक झळकावले होते. यातील कोणती खेळी स्मरणार राहिली? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, वानखेडेवर झालेल्या सामन्यात झळकावलेले द्विशतक कायम लक्षात राहिले. त्या सामन्यात आचरेकर सरही मैदानावर उपस्थित होते. त्यावेळी संघात सर्व उत्कृष्ट खेळाडू होते. तो सामना माझ्या कायम लक्षात राहिर, असे विनोद कांबळी म्हणाले.

Story img Loader