Vinod Kambli Viral Video Update: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून विनोद कांबळीचं क्रिकेट पाहिलेले चाहते हळहळले होते. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूला धड नीट उभा राहता येत नाही, चालता येत नाही, हे पाहून चाहत्यांना वाईट वाटलं होतं. मात्र “जे दिसतं, तसं नसतं” म्हणतात याचा प्रत्यय या प्रकरणातही आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द विनोद कांबळीनेच त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

विनोद कांबळीचा व्हिडीओ पाहून व्यथित झालेले त्याचे दोन शालेय मित्र रिकी आणि त्यांचा भाऊ मार्कस कौटो कांबळीला भेटण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले. तिथे पोहचल्यानंतर त्यांना धक्काच बसला. ज्या विनोद कांबळीचा व्हिडीओ पाहून ते हळहळले होते, तो आपला मित्र एकदम धडधाकट त्यांच्या स्वागतासाठी उभा असल्याचे पाहून त्यांना सुखद धक्का बसला.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

हे वाचा >> Vinod Kambli : विनोद कांबळीची अवस्था पाहून नेटीझन्सची सचिन तेंडुलकरला हाक, उभंही राहता येत नसल्याचा VIDEO पाहून चाहते हळहळले

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मार्कस कौटो यांनी विनोद कांबळीच्या घरी जाऊन त्याच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. यावेळी विनोद कांबळी अंगठा दाखवत म्हणाला, “मी ठीक आहे. देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. मी सुखरूप आणि अगदी ठणठणीत आहे.”

पत्रकार रामेश्वर सिंह यांनी कौटो बंधू आणि विनोद कांबळीच्या भेटीचा एक व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

आजही फिरकीपटूंना टोलवू शकतो

शालेय मित्र आणि एकत्र क्रिकेट खेळलेल्या आपल्या मित्रांशी थट्टामस्करी करताना विनोद कांबळी पुढे म्हणाला की, मी एकदम फिट असून तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरू शकतो. फिरकीपटूंच्या चेंडूना आजही मी मैदानाबाहेर टोलवू शकतो. जसं आपण शिवाजी पार्कमध्ये करत होतो, अशी आठवणही विनोद कांबळीने सांगितली.

यावेळी कौटो बंधू आणि विनोद कांबळीमध्ये हसतखेळत चांगली चर्चा झाल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. या भेटीनंतर भावनिक होत मार्कस यांनी प्रतिक्रिया दिली की, आम्ही फक्त दहा मिनिटांसाठी कांबळीला भेटायला गेलो होतो. पण आम्ही जवळपास पाच तास गप्पा मारल्या. जवळ जवळ दिवसच आमचा कांबळीच्या घरात गेला. त्याच्या कुटुबीयांनी आमच्यासाठी दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर त्याच्या पत्नीने आम्हाला चहा दिला.

हे ही वाचा >> एकेकाळी कोट्यधीश असलेल्या विनोद कांबळींची आताची कमाई पाहून विश्वासच बसणार नाही, फक्त ‘इतकं’ आहे उत्पन्न!

Couto brothers and vinod kambli
पत्रकार रामेश्वर सिंह यांनी हा फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर टाकला आहे. (Photo – X @RSingh6969a)

विनोद कांबळीची क्रिकेट कारकिर्द

डावखुरा फलंदाज असलेल्या विनोद कांबळीने आपल्या क्रिकेटच्या कारकि‍र्दीत १७ कसोटी सामन्यात १०८४ धावा आणि १०४ एकदिवसीय सामन्यात २४७७ धावा केलेल्या आहेत. नव्वदच्या दशकात फटकेबाजी करणारा आक्रमक फलंदाज म्हणून त्याकडे पाहिले जात होते. १९८८ साली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने शालेय क्रिकेट स्तरावर खेळत असताना ६६४ धावांची भागीदारी केली होती. ज्याची आजही आठवण सांगितली जाते.

Story img Loader